agriculture news in marathi, sugarcane crushing season status, satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात २९ लाख टन उसाचे गाळप
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 डिसेंबर 2017
सातारा ः जिल्ह्यात ऊस गाळप हंगामास वेग आला असून, जिल्ह्यातील १४ कारखान्यांचे गाळप सुरळीत सुरू आहे. सोमवारपर्यंत (ता. २५) या १४ कारखान्यांमधून एकूण २८ लाख ९१ हजार ६२४ मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे. त्याद्वारे ३१ लाख १२ हजार ३२० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. हंगामास दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊनही काही कारखान्यांकडून पहिला हप्ता दिला गेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सह्याद्री कारखान्याने साखर उत्पादन व गाळपात आघाडी घेतली आहे.
 
सातारा ः जिल्ह्यात ऊस गाळप हंगामास वेग आला असून, जिल्ह्यातील १४ कारखान्यांचे गाळप सुरळीत सुरू आहे. सोमवारपर्यंत (ता. २५) या १४ कारखान्यांमधून एकूण २८ लाख ९१ हजार ६२४ मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे. त्याद्वारे ३१ लाख १२ हजार ३२० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. हंगामास दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊनही काही कारखान्यांकडून पहिला हप्ता दिला गेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सह्याद्री कारखान्याने साखर उत्पादन व गाळपात आघाडी घेतली आहे.
 
जिल्ह्यातील आठ सहकारी व सहा खासगी कारखान्यांमध्ये पूर्ण क्षमतेने गाळप सुरळीत सुरू आहे. जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपी व अधिक २०० रुपये हा ऊसदराचा कोल्हापूर पॅटर्न मान्य केला होता. या पॅटर्नपेक्षा काही कारखान्यांकडून जास्त दर दिला जात आहे. १४ कारखान्यांनी सोमवारपर्यंत २८ लाख ९१ हजार ६२४ मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. त्याद्वारे ३१ लाख १२ हजार ३२० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
 
कारखान्यांच्या सरासरी उताऱ्यात सुधारणा होऊ लागली असून, जिल्ह्यात सरासरी साखर उतारा १०.७६ टक्के येत आहे. सह्याद्री कारखान्याने सर्वाधिक चार लाख १३ हजार ८०० मेट्रिक टन उसाचे गाळप करून चार लाख ८८ हजार ३१५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सह्याद्री कारखान्याची साखर उताऱ्यात आघाडी असून, या कारखान्याचा ११.८० टक्के साखर उतारा आहे. साखर उताऱ्यात दुसरा क्रमांक जयवंत शुगरचा असून, या कारखान्याचा सरासरी साखर उतारा ११.५८ टक्के आहे; तसेच श्रीराम, कृष्णा कारखान्याचा सरासरी साखर उतारा ११ टक्‍क्‍यांवर येऊ लागला आहे. जिल्ह्यात अजिंक्‍यतारा, कृष्णा, जयवंत, ग्रीन पॉवर, श्रीराम व न्यू फलटण या कारखान्यांनी पहिला हप्ता जाहीर केला आहे.  

ऊस गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी सर्वच कारखान्यांची गाळपाची उद्दिष्टे ठरवून हंगामास सुरवात केली आहे. उद्दिष्ट गाठण्यासाठी मिळेल तेथून ऊस आणला जात असल्याने कार्यक्षेत्रातील सभासदांच्या ऊस गाळपास विलंब केला जात असल्याचे सभासदाकडून सांगितले जात आहे.

गेटकेन ऊस जास्त आणल्याने सरासरी उताराही कमी मिळत असल्याने पुढील हंगामाच्या दरावरही परिणाम होण्याची शक्‍यता आहे. मागील हंगामात कमी दर देणाऱ्या कारखान्यास ऊस देण्यास शेतकरी अनुत्सुक असल्याचे दिसत असल्याने उद्दिष्ट गाठताना या कारखान्यांना कसरत करावी लागणार आहे. 

इतर ताज्या घडामोडी
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...
मिरज पूर्व भागात पाण्यासाठी भटकंती सुरूच सांगली : म्हैसाळ योजनेचा उपसा सुरू होऊन महिना...
धुळ्यात हरभरा खरेदी केंद्रांची संख्या... धुळे  ः धुळे जिल्ह्यातही हरभरा व तुरीला...
येवल्यातून यंदा २८७३ टन द्राक्ष निर्यात येवला, जि. नाशिक : उन्हाळा आला की ५० वर गावांची...
फळबाग लागवडीकडे नाशिकमधील शेतकऱ्यांची... नाशिक : अस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेल्या...
अकोला जिल्ह्यातील कृषी विभागात १०६ पदे...अकोला : जिल्ह्यात कृषी विभागात शंभरावर विविध पदे...
यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या...भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस...
मराठवाड्यासाठी २० सौरऊर्जा प्रकल्पांना... लातूर ः मराठवाड्यातील विजेची गरज लक्षात घेऊन...
तयारी हळद लागवडीची...हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची...
सांगली जिल्ह्यात खंडित वीजपुरवठ्याने... सांगली  : कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी...