agriculture news in marathi, sugarcane crushing season status, satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात ४५ लाख टन उसाचे गाळप
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जानेवारी 2018

सातारा : जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी रविवारी (ता. २१) एकूण ४४ लाख ९६ हजार १४६ मेट्रिक उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ५० लाख ५७ हजार ८५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उताऱ्यात सुधारणा होऊ लागली असून, जिल्ह्यात सरासरी साखर उतारा ११.२५ टक्के मिळत आहे.

जिल्ह्यातील आठ सहकारी व सहा खासगी कारखाने पूर्ण क्षमतेने सुरळीत सुरू आहेत. या कारखान्यांनी ४४ लाख ९६ हजार १४६ मेट्रिक उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ५० लाख ५७ हजार ८५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ११.२५ टक्के साखर उतारा येत आहे.

सातारा : जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी रविवारी (ता. २१) एकूण ४४ लाख ९६ हजार १४६ मेट्रिक उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ५० लाख ५७ हजार ८५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उताऱ्यात सुधारणा होऊ लागली असून, जिल्ह्यात सरासरी साखर उतारा ११.२५ टक्के मिळत आहे.

जिल्ह्यातील आठ सहकारी व सहा खासगी कारखाने पूर्ण क्षमतेने सुरळीत सुरू आहेत. या कारखान्यांनी ४४ लाख ९६ हजार १४६ मेट्रिक उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ५० लाख ५७ हजार ८५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ११.२५ टक्के साखर उतारा येत आहे.

जिल्ह्यात सह्याद्री कारखान्याने सर्वाधिक सहा लाख ३१ हजार ९०० मेट्रिक टन उसाचे गाळप करून सात लाख ६२ हजार ४९० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जयवंत शुगरची साखर उताऱ्यात आघाडी असून, या कारखान्याचा १२.११ टक्के साखर उतारा आहे. साखर उताऱ्यात दुसरा क्रमांक सह्याद्री कारखान्यांचा असून, या कारखान्यांचा १२.११ टक्के सरासरी साखर उतारा येत आहे.

बहुतांशी कारखान्यांनी गेटकेनचा ऊस कमी करून कार्यक्षेत्रातील तसेच सभासदांच्या उसाला प्राधान्य दिले आहे. यामुळे कारखान्यांच्या साखर उताऱ्यात सुधारणा होऊ लागली आहे. सर्वच कारखान्यांनी ऊसदर जाहीर केला आहे. काही कारखान्यांनी दर जाहीर न करताच थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. पहिला हप्ता १४ दिवसांच्या आत न दिल्यामुळे सहा कारखान्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा दिल्या आहेत. बाजारातील साखरेचे दर घसरल्याने बिल देताना कारखान्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

इतर ताज्या घडामोडी
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या...अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर,...
खानदेशात भुईमूग पीक जेमतेमजळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे...
सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
प्रस्तावित सुरत-हैदराबाद...नाशिक : केंद्राच्या भारतमाला योजनेंतर्गत...
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या...शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने...
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारीसांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला...