agriculture news in marathi, sugarcane crushing season status, satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात ८१ लाख ७७ हजार टन उसाचे गाळप
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 एप्रिल 2018
सातारा  ः जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली असून, उर्वरित नऊ साखर कारखान्यांचे ऊस गाळप अंतिम टप्प्यात आले आहे.  या कारखान्यांनी आतापर्यंत ८१ लाख ७७ हजार ९८७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ९७ लाख १४ हजार ९५५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ११.८८ टक्के साखर उतारा मिळत आहे. जिल्ह्यात साखर उत्पादनाची वाटचाल एक कोटी क्विंटलकडे सुरू आहे.
 
सातारा  ः जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली असून, उर्वरित नऊ साखर कारखान्यांचे ऊस गाळप अंतिम टप्प्यात आले आहे.  या कारखान्यांनी आतापर्यंत ८१ लाख ७७ हजार ९८७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ९७ लाख १४ हजार ९५५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ११.८८ टक्के साखर उतारा मिळत आहे. जिल्ह्यात साखर उत्पादनाची वाटचाल एक कोटी क्विंटलकडे सुरू आहे.
 
जिल्ह्यातील ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आला असून श्रीराम, लोकनेते बाळासाहेब देसाई, रयत, न्यू फलटण, स्वराज्य या पाच कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली आहे. जिल्ह्यातील आठ सहकारी व सहा खासगी कारखान्यांनी ८१ लाख ७७ हजार ९८७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ९७ लाख १४ हजार ९५५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
 
ऊस गाळपात सह्याद्री कारखान्याची आघाडी घेतली आहे. या कारखान्याने सर्वाधिक ११ लाख २५ हजार ४०० टन उसाचे गाळप केले असून, १३ लाख ९२ हजार ६८० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जयवंत शुगरने साखर उताऱ्यात आघाडी घेतली असून या कारखान्याचा उतारा १२.९१ टक्के आहे. सर्वांत कमी साखर उतारा ‘स्वराज’चा १०.१९ टक्के आहे. 
 
जिल्ह्यात एकूण गाळपापैकी आठ सहकारी कारखान्यांनी ४५ लाख ८५ हजार ४५४ टन ऊस गाळपाद्वारे ५५ लाख ५१ हजार १८० क्‍विंटल साखर उत्पादित केली आहे. सहा खासगी कारखान्यांनी ३५ लाख ९१ हजार ५३३ टन ऊस गाळपाद्वारे ४१ लाख ६३ हजार ७७५ क्विंटल साखर उत्पादित केली आहे. उर्वरित कारखान्यांचा हंगाम एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत चालणार आहे. या हंगामात साखर निर्मितीची वाटचाल एक कोटी क्विंटलकडे सुरू आहे. 

ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने तसेच पाण्याची टंचाई भासू लागल्याने शेतकरी लवकरात लवकर ऊस तुटला जावा, यासाठी साखर कारखाने तसेच चिठबॉय यांच्याकडे चकरा मारत आहेत. या शेतकऱ्यांच्या असाह्यतेचा फायदा ऊसतोड मजुरांकडून घेतला जात आहे. एकर दोन ते पाच हजार रुपयांची मागणी शेतकऱ्यांकडे केली जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...