agriculture news in marathi, sugarcane crushing season status, satara, maharashtra | Agrowon

साताऱ्यात एक कोटी सात लाख क्विंटल साखर उत्पादन
टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 मे 2018

सातारा : जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या यंदाच्या गाळप हंगामाची नुकतीच सांगता झाली. जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी ८९ लाख ५७ हजार ९८९ टन उसाचे गाळप केले. त्यातून एक कोटी सात लाख ५२ हजार ३३० क्विंटल साखर उत्पादन झाले असून, सरासरी १२.०० टक्के उतारा मिळाला आहे. गाळप व साखर निर्मितीत ‘सह्याद्री’ने तर साखर उताऱ्यात व जयवंत शुगरने आघाडी कायम ठेवली.

सातारा : जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या यंदाच्या गाळप हंगामाची नुकतीच सांगता झाली. जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी ८९ लाख ५७ हजार ९८९ टन उसाचे गाळप केले. त्यातून एक कोटी सात लाख ५२ हजार ३३० क्विंटल साखर उत्पादन झाले असून, सरासरी १२.०० टक्के उतारा मिळाला आहे. गाळप व साखर निर्मितीत ‘सह्याद्री’ने तर साखर उताऱ्यात व जयवंत शुगरने आघाडी कायम ठेवली.

जिल्ह्यातील आठ सहकारी व सहा खासगी कारखान्यांनी यंदाच्या हंगामात ऊस गाळप केले. जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने हा हंगाम मे महिन्याच्या तिसऱ्या सप्ताहपर्यंत सुरू राहिला. या हंगामात सर्वाधिक सह्याद्री कारखान्याने १४ लाख ४४ हजार ११७  टन उसाचे गाळप केले असून, १८ लाख दोन हजार ७०० क्विंटल साखर उत्पादन केले. साखर उताऱ्यात जयवंत शुगर कारखान्याची आघाडी असून, या कारखान्याचा सरासरी उतारा १२.९७ टक्के आला.

जिल्ह्यात खासगी कारखान्यांच्या संख्येत वाढ झाल्याने या कारखान्यांकडून ऊस गाळपाचे प्रमाण वाढले आहे. सहा खासगी कारखान्यांनी ३७ लाख आठ हजार ६८८ टन उसाचे गाळप करीत ४३ लाख २६ हजार ८०५ क्विंटल साखर उत्पादन केले आहे; तसेच आठ सहकारी कारखान्यांकडून ५२ लाख ४९ हजार ३०१ टन ऊस गाळप करून ६४ लाख २५ हजार ५२५ क्विंटल साखर उत्पादन केले आहे.

जिल्ह्यातील आठ सहकारी व सहा खासगी कारखान्यांचे गाळप नोव्हेंबर महिन्यात सुरू झाले होते. ऊसदरातील शाश्‍वतता वाढू लागल्याने जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. उद्दिष्टे निश्‍चित ठेवत सर्वच कारखान्यांनी हंगामास सुरुवात केली होती. साधारणपणे चार ते पाच महिने हंगाम सुरू राहील असा अंदाज व्यक्त केला जात होता.

मात्र, ऊस क्षेत्रातील वाढीमुळे सर्वच कारखान्यांचा अंदाज चुकला असून, प्रत्येक कारखान्याचा हंगाम १५ ते ४५ दिवस जास्त चालला आहे. यामुळे सर्वच कारखान्यांचे गाळप जास्त झाल्याने कधी नव्हे ते एक कोटी क्विंटलपेक्षा जास्त साखरनिर्मिती झाली आहे.

जिल्ह्यात ऊस हंगाम सुरळीत चालावा, यासाठी हंगामाच्या सुरुवातीलाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारखाना व शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेतली होती. या बैठकीत एफआरपी व अधिक दोनशे हा फॉर्म्यूला मान्य करण्यात आला होता. मात्र, हंगामाच्या मध्यावर साखरेचे दर कमी होऊ लागल्याने पहिल्या हप्त्यातच कारखान्यांनी १०० ते ३०० रुपये कपात केली.

यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळा दर मिळाला आहे. साखरेच्या दरातील झालेली घसरण व ऊस शिल्लक राहील, या भीतीने शेतकऱ्यांनी किती बिल दिले जातेय, याकडे न बघता ऊस तुटण्यास प्राधान्य दिले होते.

इतर ताज्या घडामोडी
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...
येवला तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवणनाशिक : कमी पावसामुळे येवला तालुक्यात पाणीटंचाई...
हवामानविषयक समस्यांमुळे शेतीवर परिणाम ः...परभणी ः जागतिक तापमान वाढ, पावसातील अनियमितता,...
मतदार यादीत वाढला महिलांचा टक्कानगर : निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा...
तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना...परभणी : तापमानातील चढ-उतारामुळे अंजिराची फळे...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर वाढलेपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
यंदा मतदानात महिला पुरुषांना मागे टाकणारनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये पुरुषांपेक्षा...
शक्तिशाली उल्कापातापासून बचावली पृथ्वीपुणे ः अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’...
संत्रा बागांना उरला केवळ टॅंकरचा आधारअमरावती : संत्रा बागा जगविण्यासाठी...
मराठवाड्याच्या पाण्यासाठी फक्त बोलून...परभणी : केवळ जायकवाडीच्या हक्काच्या...
राज्यात चार हजाराने मतदान केंद्रे वाढलीमुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात...
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा...मुंबई : गेले सहा महिने विविध समविचारी पक्षांशी...
चंद्रपूर : बांगडेंच्या उमेदवारीने...चंद्रपूर : गेल्या पंधरवाड्यापासून चंद्रपूर...
प्रियांका गांधींचा नागपुरात होणार रोड शोनागपूर ः काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ...
अमरावती लोकसभेसाठी होईल दुहेरी लढतअमरावती : शिवसेनेकडून दोनदा संसदेत गेलेल्या...
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...