agriculture news in marathi, sugarcane crushing season status,khandesh, maharashtra | Agrowon

खानदेशात ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 मार्च 2018
जळगाव : खानदेशात ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आहे; परंतु काही कारखान्यांचे गाळप आणखी महिनाभर चालणार आहे. न्हावी (ता. यावल) येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपला असून, या कारखान्याने यंदा दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. 
 
खानदेशात सहकारी तत्त्वावरील प्रमुख साखर कारखान्यांमध्ये ‘मधुकर’सह नंदुरबार येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना (डोकारे, ता. नवापूर), पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथील सातपुडा सहकारी साखर कारखाना व चहार्डी (ता. चोपडा) येथील चोपडा सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.
जळगाव : खानदेशात ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आहे; परंतु काही कारखान्यांचे गाळप आणखी महिनाभर चालणार आहे. न्हावी (ता. यावल) येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपला असून, या कारखान्याने यंदा दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. 
 
खानदेशात सहकारी तत्त्वावरील प्रमुख साखर कारखान्यांमध्ये ‘मधुकर’सह नंदुरबार येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना (डोकारे, ता. नवापूर), पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथील सातपुडा सहकारी साखर कारखाना व चहार्डी (ता. चोपडा) येथील चोपडा सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.
सहकारी साखर कारखान्यांमध्ये गाळपात सातपुडा सहकारी साखर कारखाना आघाडीवर आहे. चोपडा साखर कारखान्यातही सुमारे ६० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. मधुकर सहकारी साखर कारखान्याने यंदा ९४ हजार पोती साखरेचे उत्पादन केले आहे. ८.९० टक्के एवढा साखर उतारा मिळाला आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये गाळपाला सुरवात झाली होती. इतर कारखानेही नोव्हेंबरमध्येच सुरू झाल्याची माहिती मिळाली.
 
मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चार हजार हेक्‍टर उसाची नोंद होती. ऊसतोडणीला मजूर हवे तेवढे मिळाले नाहीत. त्यामुळे अनेक अडचणी आल्या तरी त्यावर मात करून खानदेशातील सहकारी साखर कारखान्यांनी गाळपात चांगली कामगिरी केल्याचे सांगण्यात आले. आदिवासी सहकारी साखर कारखाना हा नवापूर या आदिवासी शेतकरीबहुल भागात आहे. गुजरातमधील खासगी कारखानाचालकांशी चांगली स्पर्धा करून हा कारखानाही गाळपाबाबत चांगली कामगिरी करीत असल्याचे सांगण्यात आले.
 
खासगी कारखान्यांमध्ये अॅस्टीरीया शुगर (समशेरपूर, ता. नंदुरबार) व मुक्ताई साखर कारखाना (मुक्ताईनगर, जि. जळगाव) यांचा समावेश असून, या कारखान्यांनीही गाळप चांगले करून ऊस उत्पादकांना दिलासा दिल्याची माहिती मिळाली. 

शिरपूर साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांना मध्यंतरी आंदोलन करावे लागले. हा कारखाना सुरू करावा, अशी मागणी यंदा करण्यात आली असून हा सहकारी साखर कारखाना चांगले गाळप करू शकतो. सर्वपक्षीय राजकीय मंडळींनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे आत्माराम पाटील (कापडणे, ता. धुळे) यांनी मध्यंतरी केली होती.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...