agriculture news in marathi, sugarcane crushing season status,kolhapur, maharashtra | Agrowon

कोल्हापुरातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 मार्च 2018
कोल्हापूर : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू अंतिम टप्प्यात येत आहे. मार्च महिन्याच्या मध्याअखेर जिल्ह्यात १ कोटी ३० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील तालुक्‍यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम हळूहळू संपत आहे. २२ पैकी ११ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे.
 
कोल्हापूर : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू अंतिम टप्प्यात येत आहे. मार्च महिन्याच्या मध्याअखेर जिल्ह्यात १ कोटी ३० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील पश्‍चिमेकडील तालुक्‍यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम हळूहळू संपत आहे. २२ पैकी ११ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे.
 
अद्यापही जिल्ह्यातील शिवारांमध्ये पंधरा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाविना शिल्लक आहे. करवीर, हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यातील बहुतांशी साखर कारखान्यांचा हा ऊस आहे. यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे गाळप एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
 
गेल्या पंधरा दिवसांपासून ऊन वाढत असल्याने त्याचा स्पष्ट परिणाम कारखान्यांच्या गळित हंगामावर दिसून येत आहे. अगोदरच पन्नास टक्के मनुष्यबळावर साखर कारखान्यांनी ऊसतोडणी सुरू केली आहे. यामुळे अपेक्षित वेळापत्रकापेक्षा दहा ते पंधरा दिवसांनी तोडणी पुढे जात आहे. याचा सर्व ताण कारखान्यांच्या तोडणी यंत्रणेवर येत आहे. परिणामी, कारखान्याच्या ऊस विकास विभागात नियोजनाबाबतही ताण येत असल्याचे कारखान्यांच्या ऊस विकास विभागातून सांगण्यात आले. 
 
एका गावातून ऊसतोडणी यंत्रणा दुसऱ्या गावात नेईपर्यंत व्यवस्थापनाची दमछाक होत आहे. तोडणी आवरत नसल्याने मजुरांच्या क्रयशक्तीवरही परिणाम होत असल्याने ऊसतोडणी संथ गतीने होत आहे. अनेक मोठ्या कारखान्यांचा हंगाम पंधरा दिवस राहिला आहे; पण तो पूर्ण करेपर्यंत व्यवस्थापनाची मोठी धावपळ होत असल्याचे कारखान्यांच्या सूत्रांनी सांगितले. 

गळीत हंगामात ऊन व मजूरटंचाईचा अडथळा निर्माण होत असला तरी यंदा शिवारात ऊस शिल्लक राहण्याची शक्‍यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही कारखाने एप्रिलच्या मध्यापर्यंत चालू शकतील. पावसाचा अडथळा न आल्यास यंदाचा हंगाम एप्रिलच्या पहिल्या सप्ताहापर्यंत संपू शकेल, अशी शक्‍यता साखर कार्यालयाच्या सूत्रांनी व्यक्त केली.

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...