agriculture news in marathi, sugarcane crushing season status,marathwada, maharashtra | Agrowon

औरंगाबाद विभागात ७२ लाख ५१ हजार टन ऊस गाळप
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 मार्च 2018
औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील सहा जिल्ह्यांमधील २२ साखर कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभाग नोंदविला. या सर्व कारखान्यांनी आतापर्यंत ७२ लाख ५१ हजार ८१५ टन उसाचे गाळप केले आहे. या सर्व साखर कारखान्यांचा साखर उतारा सरासरी ९.७४ टक्‍के राहिला असून, ७० लाख ६३ हजार ७२१ क्‍विंटल साखर उत्पादन झाले आहे. 
 
औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील सहा जिल्ह्यांमधील २२ साखर कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभाग नोंदविला. या सर्व कारखान्यांनी आतापर्यंत ७२ लाख ५१ हजार ८१५ टन उसाचे गाळप केले आहे. या सर्व साखर कारखान्यांचा साखर उतारा सरासरी ९.७४ टक्‍के राहिला असून, ७० लाख ६३ हजार ७२१ क्‍विंटल साखर उत्पादन झाले आहे. 
 
औरंगाबादच्या प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या अखत्यारित मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड व खानदेशातील धुळे, नंदूरबार व जळगाव असे सहा जिल्हे येतात. या सहा जिल्ह्यांतील ३७ साखर कारखान्यांपैकी २२ साखर कारखान्यांनी यंदा ऊस गाळप हंगामात सहभाग नोंदविला. 
 
धुळे जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळपात सहभाग नोंदविला नाही. नंदूरबार जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी ९ लाख १२ हजार ६२६ टन उसाचे गाळप करत ९.८२ टक्‍के साखर उताऱ्याने ८ लाख ९६ हजार १९१ क्‍विंटल साखर उत्पादन केले. जळगाव जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी ३ लाख ५१ हजार ८२७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. सरासरी ९.०१ टक्‍के उताऱ्याने ३ लाख १७ हजार २० क्‍विंटल साखर उत्पादन या कारखान्यांनी केले. 
 
औरंगाबाद जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग नोंदविला. या पाच कारखान्यांनी १२ लाख ९८ हजार ४५५ टन ऊस गाळप करीत १२ लाख ६४ हजार ३३५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले. जालना जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी १६ लाख ८९ हजार ६७२ मेट्रिक टन उसाचे गाळप करत १६ लाख ७२ 
हजार ५५० क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले. 
 
बीड जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांनी २९ लाख ९९ हजार २३५ टन उसाचे गाळप केले. सरासरी ९.७१ टक्‍के साखर उताऱ्यातून २९ लाख १३ हजार ६२५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन या कारखान्यांनी घेतल्याचे साखर विभागाचे आकडे सांगतात. 
 
खानदेशातील दोन व मराठवाड्यातील एक मिळून तीन साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. या कारखान्यांमध्ये नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी सहकारी साखर कारखाना, जळगाव जिल्ह्यातील संत मुक्‍ताबाई शुगर अँड एनर्जी तसेच जालना जिल्ह्यातील रामेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.
 
या कारखान्यांपैकी नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासी कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक १०.१९ टक्‍के राहिला. जळगाव व जालना जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचा उतारा अनुक्रमे ९.३३ व ९.१३ टक्‍के राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...