सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख टन ऊस गाळप

ऊस गाळप हंगाम
ऊस गाळप हंगाम
नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या १८ सहकारी आणि ९ खासगी साखर कारखान्यांत मिळून आतापर्यंत एक कोटी २१ लाख ६७ हजार १०७ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. या कारखान्यांत मिळून १ कोटी ३० लाख ३३ हजार ३३८ क्‍विंटल साखर उत्पादन झाले असल्याची माहिती नगर येथील सहायक साखर आयुक्त कार्यालयातून देण्यात आली. 
 
नगर जिल्ह्यात १४ सहकारी आणि ९ खासगी साखर कारखाने आहेत. त्यात सर्व सहकारी कारखाने सुरू असून एक खासगी कारखाना बंद आहे. नाशिक जिल्ह्यातील पाच सहकारी व चार खासगी अशा नऊ साखर कारखान्यांपैकी दोन सहकारी आणि खासगी कारखाने बंद आहेत. आतापर्यंत नगर व नाशिकमधील १७ सहकारी साखर कारखान्यांनी ८० लाख ४६ हजार ३३ मेट्रिक टन तर खासगी कारखान्यांनी ४१ लाख २१ हजार ७४ असे १ कोटी २१ लाख ६७ हजार १०७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.
 
आतापर्यंत सहकारी कारखान्यांनी ८६ लाख ४६ हजार ४४० तर खासगी कारखान्यांनी ४३ लाख ८६ हजार ८९८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. भेंडा येथील ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक ९ लाख ३८ हजार ६२० मेट्रिक टन उसाचे गाळप करून १० लाख ४२ हजार १५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. जिल्हाभरातील
 
साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अजूनही मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. त्यामुळे ऊस कारखान्याला कधी जाईल याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.  
 
कारखानानिहाय उसाचे गाळप (टन) ः कंसात साखर उत्पादन (क्विंटल)  : संजीवनी ः ५,५१,७४४ (५,५६,७००), शंकरराव काळे ः ५,१८,७७५ (५,३५,०००), गणेश ः २,५१,३०० (२,७३,४७५), अशोक ः ४,८५,४५० (५,०६,१५०), डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ः ७,४६,१५० (८,६०,०५०), डॉ. बा. बा. तनपुरे (राहुरी) ः १,८८,०९६ (२,१२,१२५), श्रीगोंदा ः ६,४१,८५० (७,०६,०७५), सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात ः ९,०५,८५० (१०,०४,६००), ज्ञानेश्‍वर ः ९,३८,६२० (१०,४२,१५०), वृद्धेश्‍वर ः ३,६८,९८५ (३,८३,०००), मुळा ः ७,७२,७८० (८,२७,६००).
 
अगस्ती कारखाना ः ४,४३,७२० (४,६७,५२०), केदारेश्‍वर ः २,१९,८१० (१,९८,२७०), कुकडी ः ६,१३,६५० (६,६०,६००), क्रांती शुगर (पारनेर) ः १,७६,१०५ (१,९१,७७५), पीयूष शुगर (नगर) ः १,८८,७३२ (१,५८,०००), अंबालिका (कर्जत) ः १३,४८,८५० (१५,४५,३५०), गंगामाई (शेवगाव) ः ७,८६,६२० (८,०४,६८०), साईकृपा (१) ः २,२९,०६५ (२,४३,५५०), प्रसाद शुगर (वांबोरी) ः ३,३५,२१० (३,४४,५५०), जय श्रीराम शुगर ः २,०५,००१ (१,९३,३५०).
 
युनिटेक शुगर ः २,२६,२५८ ( २,४१,८५०), के. के. वाघ ः १७,११८ (१२,२२५), कादवा ः २,३७,८१७ (२,७१,७००), वसंतदादा (कळवण) ः १,४४,३१४ (१,०९,२००), द्वारकाधीश ः ५,१३,३४५ (५,६५,७२५), एजीएस शुगर ः १,१२,८८८ (९८,०६८).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com