agriculture news in marathi, sugarcane crushing season status,nanded, maharashtra | Agrowon

नांदेड विभागात ७८ लाख टन ऊस गाळप
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 एप्रिल 2019

नांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागांतर्गत असलेल्या परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या ४ जिल्ह्यांतील २३ साखर कारखान्यांचा २०१८-१९ मधील गाळप हंगाम संपला आहे. नांदेड विभागातील साखर कारखान्यांनी एकूण ७८ लाख ६२ हजार ३३३ टन ऊस गाळप केले. सरासरी ११.२३ टक्के उताऱ्याने ८८ लाख २७ हजार २०२ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सर्वाधिक ३५ लाख २२ हजार ६१२ टन ऊस गाळप केले आहे. सरासरी ११.४८ टक्के साखर उताऱ्याने ४० लाख ४२ हजार ५७५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.

नांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागांतर्गत असलेल्या परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या ४ जिल्ह्यांतील २३ साखर कारखान्यांचा २०१८-१९ मधील गाळप हंगाम संपला आहे. नांदेड विभागातील साखर कारखान्यांनी एकूण ७८ लाख ६२ हजार ३३३ टन ऊस गाळप केले. सरासरी ११.२३ टक्के उताऱ्याने ८८ लाख २७ हजार २०२ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सर्वाधिक ३५ लाख २२ हजार ६१२ टन ऊस गाळप केले आहे. सरासरी ११.४८ टक्के साखर उताऱ्याने ४० लाख ४२ हजार ५७५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.

नांदेड विभागातील २४ पैकी ११ सहकारी आणि १२ खासगी अशा २३ साखर कारखान्यांनी २७ आॅक्टोबर २०१८ ते ७ एप्रिल २०१९ या कालावधीत ऊस गाळप केले. यंदा परभणी जिल्ह्यातील ५ खासगी साखर कारखान्यांनी २१ लाख ७१७ टन उसाचे गाळप केले आहे. एकूण २२ लाख ७७ हजार ११२ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यात सरासरी १०.८४ टक्के साखर उतारा आला आहे. माखणी (ता. गंगाखेड) येथील गंगाखेड शुगर्स कारखान्याने सर्वाधिक ९ लाख १ हजार ११९ टन ऊस गाळप केले असून १०.२६ टक्के साखर उताऱ्याने एकूण ९ लाख २४ हजार ७२५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. कानडखेड (ता. पूर्णा) येथील बळिराजा शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक सरासरी १२ टक्के आला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ४ सहकारी आणि १ खाजगी अशा ५ साखर कारखान्यांनी मिळून एकूण ११ लाख १ हजार ११३ टन उसाचे गाळप केले आहे. एकूण १२ लाख ७ हजार २७० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी ११.३८ टक्के साखर उतारा आला आहे. पूर्णा सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक ४ लाख ५९ हजार ६५७ टन ऊस गाळप केले आहे. एकूण ४ लाख ९६ हजार ७०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. डोंगरकडा येथील भाऊराव चव्हाण युनिट २ या साखर कारखान्याचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक ११.७८ टक्के आला आहे.

नांदेड जिल्ह्यातील ३ सहकारी आणि २ खासगी अशा एकूण ५ साखर कारखान्यांनी मिळून एकूण ११ लाख ३७ हजार ८९० टन ऊस गाळप केला आहे. एकूण १२ लाख ५५ हजार ५९५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. सरासरी १०.०३ टक्के साखर उतारा आला आहे. भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने सर्वाधिक ३ लाख ८२ हजार ७११ टन ऊस गाळप केले असून ४ लाख ३१ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट ४ चा साखर उतारा सर्वाधिक ११.६२ टक्के आला आहे.

लातूर जिल्ह्यातील ४ सहकारी आणि ४ खासगी अशा एकूण ८ साखर कारखान्यांनी एकूण ३५ लाख २२ हजार ६१२ टन उसाचे गाळप केले आहे. एकूण ४० लाख ४२ हजार ५७५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी ११.४८ टक्के साखर उतारा आला आहे. मांजरा साखर कारखान्याने सर्वाधिक ७ लाख ३ हजार ५४१ टन ऊस गाळप केले असून ८ लाख ४३ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. रेणा साखर कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक १२.२२ टक्के आला आहे.

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या...फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील...
सावळी मोहितकर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून...नागपूर ः शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी स्तरावर...
हळदीला १० हजार रुपये क्विंटल हमीभाव...नांदेड : राज्य आणि केंद्र सरकारने हमीभावाच्या...
चिखलीतील तेल्हारा धरणाच्या गेटदुरुस्तीस...बुलडाणा ः पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या चिखली...
गंगापुरात बनावट खतसाठा जप्तऔरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर येथील एका खत...
सहकार आयुक्तालयातील नियुक्त्यांचे घोळ...पुणे  : दुष्काळ, कर्जमाफी आणि घसरलेले...
संत्रा बाग वाळल्याने नयाखेडा येथील...अमरावती ः चार बोअरवेल घेतले, इतरांच्या...
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली...
झाडावर नाही, काळजावर घाव पडतात नगर ः ‘‘दहा वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली...
सातारा जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे...सातारा  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
नगरमधील शेतकऱ्यांना साडेचाळीस कोटींचे...नगर  ः सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल २००...
सांगलीत शेतकऱ्यांचा जनावरांसह मोर्चासांगली  : जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता...
वऱ्हाडात बाजी कुणाची?अकोला ः  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही...
पुणे विभागात ‘जलयुक्त’ची आठ हजारांवर...पुणे : भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने...
नेता निवडीचा अधिकार राहुल गांधींनामुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता...
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...