agriculture news in marathi, sugarcane crushing season status,satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात ३९ लाख टन उसाचे गाळप
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जानेवारी 2018

सातारा : जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरळीत सुरू आहे. या कारखान्यांनी आतापर्यंत ३९ लाख ४७ हजार ५७५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ४३ लाख ८९ हजार २०२ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ११.१२ टक्के साखर उतारा मिळत आहे. 

सातारा : जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरळीत सुरू आहे. या कारखान्यांनी आतापर्यंत ३९ लाख ४७ हजार ५७५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ४३ लाख ८९ हजार २०२ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ११.१२ टक्के साखर उतारा मिळत आहे. 

जिल्ह्यातील ऊस हंगाम मध्यावर आला असून आठ सहकारी व सहा खासगी कारखान्यांचे गाळप सुरू आहे. या कारखान्यांनी ३९ लाख ४७ हजार ५७५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ४३ लाख ८९ हजार २०२ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सह्याद्री कारखान्याने सर्वाधिक पाच लाख ५३ हजार ८०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, सहा लाख ६४ हजार ७३५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.

जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांकडून ऊस दर जाहीर करण्यात आला असल्याने दराबाबतचे चित्र स्पष्ट झाले आहे. काही कारखान्यांनी जास्त दर देणाऱ्या कारखान्यांच्या तुलनेत दर कमी दिला असल्याने जाहीर न करताच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत.

जिल्ह्यात एकूण गाळपापैकी सहकारी कारखान्यांनी २१ लाख ८२ हजार ७५३ टन ऊस गाळपाद्वारे २४ लाख ९० हजार ७७५ क्‍विंटल साखर निर्मिती केली आहे. तर सहा खासगी कारखान्यांनी १७ लाख ६४ हजार ८२२ टन ऊस गाळपाद्वारे १८ लाख ९८ हजार ४२७ क्विंटल साखर निर्मिती केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा ‘सह्याद्री’चा १२ तर सर्वात कमी साखर उतारा ‘स्वराज’चा ९.८४ टक्के आहे.

पहिला हप्ता जाहीर करताना साखरेचे दर चांगले असल्याने साखर कारखान्यांनी २७०० ते तीन हजार रुपये दरम्यान दर दिला होता. सध्या साखरेच्या दरात घसरण झाल्यामुळे साखर कारखान्यांमध्ये चिंता निर्माण झाली. यामुळे दर जाहीर केलेल्यापेक्षा पहिला हप्ता कमी दिला जाणार असल्याच्या चर्चाला उधाण आले आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांत मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...