agriculture news in marathi, sugarcane crushing season status,satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात ६३ लाख टन उसाचे गाळप
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018
सातारा ः जिल्ह्यात ऊस गाळप अंतिम टप्प्यात आला असून, लवकर ऊस तुटून जावा यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. प्रति एकर एक हजार ते पाच हजार रुपये तोडणीसाठी ऊस तोड मजुरांकडून मागितले जात आहेत. जिल्ह्यात १४ कारखान्यांकडून आतापर्यंत ६३ लाख ४० हजार १८६ टन उसाचे गाळप झाले असून, याव्दारे ७३ लाख ७० हजार ४६० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
 
ऊस गाळप अंतिम टप्यात येऊ लागल्याने पाणीटंचाई, उसाचे वजन यावे, तसेच शेत लवकर मोकळे होण्याकरिता शेतकऱ्यांकडून ऊस लवकर तुटावा यासाठी धडपड सुरू आहे. याचा ऊसतोड मजुरांकडून फायदा घेतला जात आहे. एकरी एक हजार ते पाच हजार रुपये मागितले जात आहे.
 
या प्रकारची शेतकऱ्यांची लूट सुरू असतानाही साखर कारखान्यांकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांना नाइलस्तव पैसे द्यावे लागत आहेत. अजून ऊस शिल्लक असल्याने एप्रिल महिन्यांच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गाळप हंगाम सुरू राहण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात ६३ लाख ४० हजार १८६ टन उसाचे गाळप झाले असून, त्याद्वारे ७३ लाख ७० हजार ४६० क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ११.६२ टक्के उतारा मिळत आहे.
 
एकूण गाळपात आठ सहकारी कारखान्यांकडून ३५ लाख ४५ हजार ९३ टन ऊस गाळपाद्वारे ४२ लाख चार हजार ७०० क्विंटल, तर सहा खासगी कारखान्यांकडून २७ लाख ९५ हजार ९३ टन ऊस गाळपाद्वारे ३१ लाख ६५ हजार ७६० क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. गाळपात ‘सह्याद्री’ने तर साखर उताऱ्यात ‘जयवंत शुगर’ने आघाडी घेतली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...