agriculture news in marathi, sugarcane crushing season status,satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात ऊस गाळप साडेपंधरा लाख टनांनी वाढले
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 मार्च 2018
सातारा  ः जिल्ह्यात उसाच्या वाढलेल्या क्षेत्रामुळे गतवर्षीच्या तुलनेत आजपर्यंत सुमारे १५ लाख ५० हजार ६७५ मेट्रिक टन उसाचे अधिक गाळप झाले आहे. जिल्ह्यात सोमवारअखेर (ता. ५) ६९ लाख ८१ हजार ८३२ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून ८१ लाख ७७ हजार २१५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे तसेच अनेक कारखान्यांनी वाढविलेली गाळप क्षमता यामुळे गतवर्षीच्या तुलनेत अधिक गाळप झाले आहे. 
 
सातारा  ः जिल्ह्यात उसाच्या वाढलेल्या क्षेत्रामुळे गतवर्षीच्या तुलनेत आजपर्यंत सुमारे १५ लाख ५० हजार ६७५ मेट्रिक टन उसाचे अधिक गाळप झाले आहे. जिल्ह्यात सोमवारअखेर (ता. ५) ६९ लाख ८१ हजार ८३२ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून ८१ लाख ७७ हजार २१५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे तसेच अनेक कारखान्यांनी वाढविलेली गाळप क्षमता यामुळे गतवर्षीच्या तुलनेत अधिक गाळप झाले आहे. 
 
जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी ६९ लाख ८१ हजार ८३२ मेट्रिक टन ऊस गाळपाद्वारे ८१ लाख ७७ हजार २१५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. गतवर्षी १५ मार्च अखेर ५४ लाख ३१ लाख १५७ मेट्रिक टन ऊस गाळपाद्वारे ६५ लाख १६ हजार १८६ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी १५ लाख ५० हजार ६७५ मेट्रिक टन उसाचे अधिक गाळप झाले तर १६ लाख ६१ हजार २९ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. 
 
जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक असल्याने या हंगामाचे दिवस लांबणार असून, अनेक कारखान्यांचा गाळप एप्रिल अखेरपर्यंत चालणार असल्याचे सांगितले जात आहे. या गाळप हंगामात सह्याद्री कारखान्याने गाळप व साखरनिर्मितीत तर जयवंत शुगरने साखर उताऱ्यात आघाडी कायम ठेवली आहे.
 
एफआरपी रकमेत झालेल्या वाढीमुळे उसाचे दरात शाश्‍वती आली आहे. यामुळे जिल्ह्यात उसाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहेत. पुढील गाळपासाठी जिल्ह्यात अजूनही उसाची लागवड केली जात असल्याने उसाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. या दृष्टीने साखर कारखान्यांना गाळप हंगामाचे नियोजन करावे लागणार आहे.
 
गतवर्षीच्या तुलनेत गाळपाचे आकडे वाढले असले तरी जिल्ह्यातील सरासरी उताऱ्यात मात्र घट झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिल्ह्यात गतवर्षी सरासरी १२ टक्के साखर उतारा मिळाला होता, या वर्षी मात्र ११.७१ टक्के सरासरी उतारा मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत ०.२९ टक्के साखर उतारा कमी मिळत आहे. सहकारी कारखान्यांच्या सरासरी साखर उताऱ्यात ०.१९, तर खासगी कारखान्यांच्या साखर उताऱ्यात ०.३१ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...