उचांकी दर देेण्याचा 'क्रांती'चा सहकारात आदर्श

उचांकी दर देेण्याचा 'क्रांती'चा सहकारात आदर्श
उचांकी दर देेण्याचा 'क्रांती'चा सहकारात आदर्श

कुंडल, जि. सांगली : क्रांती सहकारी कारखान्याने राज्यात उचांकी दर देऊन सहकारात आदर्श निर्माण केल्याचे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. कुंडल (जि. सांगली) येथील क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या १६व्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी बोलत होते. या वेळी आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा परिषदचे सदस्य शरड लाड उपस्थित होते.  श्री. शिंदे म्हणाले,की लोकांच्या मनातील नेता हाच खरा लोकनेता ठरतो. स्व. बापूंच्या शिस्तीचा धडा घेत अण्णांसारखे संयमी नेतृत्व उभे राहिले आहे. यामुळे कारखान्याची प्रगती झाली आहे. क्रांतीचे या गळीत हंगामात ८ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. ते नक्की पूर्ण होईल, कारखाना चांगल्या प्रतिचा ऊसगाळप करत आहे. ऊसतोडणीचे नियोजन काटेकोरपणे केले जात. कारखान्याकडून शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी योग्य मार्गदर्शन करण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळत आहे. या वर्षी नवीन आसवनी प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने असल्याचे म्हणाले.  या वेळी क्रांती कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप पाटील, सर्व संचालक, कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे, ऊस विकास अधिकारी विलास जाधव, शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com