agriculture news in marathi, sugarcane crushing status, satara, maharashtra | Agrowon

साताऱ्यात आठ लाख ८८ हजार टन उसाचे गाळप
टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 नोव्हेंबर 2017
सातारा: जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस गाळप सुरू झाला आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आठ लाख ८८ हजार ८४८ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे आठ लाख ७९ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. हंगाम सुरू होऊन तीन आठवडे उलटले असले तरी अजिंक्‍यतारा कारखान्याचा अपवाद वगळता इतर कोणत्याही कारखान्याने पहिली उचल जाहीर केलेली नाही.
 
सातारा: जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस गाळप सुरू झाला आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आठ लाख ८८ हजार ८४८ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे आठ लाख ७९ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. हंगाम सुरू होऊन तीन आठवडे उलटले असले तरी अजिंक्‍यतारा कारखान्याचा अपवाद वगळता इतर कोणत्याही कारखान्याने पहिली उचल जाहीर केलेली नाही.
 
जिल्ह्यात नऊ सहकारी व सहा खासगी कारखान्याने असून, एकूण १५ कारखान्यांपैकी बहुतांशी कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यात आठ लाख ८८ हजार ८४८ मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले असून, त्याद्वारे आठ लाख ७९ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
 
गाळपात सह्याद्री कारखान्याने सर्वाधिक एक लाख ७६ हजार १०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, एक लाख ९७ हजार ४८० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. साखर उताऱ्यामध्ये जयवंत शुगर कारखान्याची आघाडी असून, या कारखान्याचा सरासरी उतारा ११.०४  टक्के आहे. हंगामाची सुरवात असल्याने जयवंत शुगरचा अपवाद वगळता अतर सर्वच कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १० टक्‍क्‍यांच्या आत येत आहे.
 
जिल्ह्यातील १५ पैकी अकरा कारखान्यांनी ऊसदराचा कोल्हापूर पॅटर्न मान्य केला आहे; मात्र फलटण तालुक्‍यातील तीन व कऱ्हाड तालुक्‍यातील एका कारखान्याने या पॅटर्नबाबतची भूमिक स्पष्ट केलेली नाही. अजिंक्‍यतारा कारखान्याने प्रतिटनास तीन हजार रुपये दर जाहीर करत दराची कोंडी फोडली आहे; मात्र हंगामास तीन आठवडे पूर्ण होऊनही इतर कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केलेली नाही. 

इतर ताज्या घडामोडी
देशातील रब्बी पेरणी माघारलीनवी दिल्ली  : देशभरात शुक्रवारअखेर (ता. ८)...
कुपोषण, प्रथिने जागृतीकडे लक्ष...पुणे : भारतात प्रथिनांच्या कमततेअभावी होणाऱ्या...
‘त्या’ कंपनीला काळ्या यादीत टाका :...लातूर ः येथील शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर...
रेशन धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशिन...वडूज, जि. सातारा : रेशन घेण्यास आलेल्या...
भारनियमनामुळे शेती ऑफलाइननांदुरा, जि. बुलढाणा : शासनाने सर्व योजनांचे...
दूध संघांना अनुदान द्या : अरुण नरकेपुणे ः राज्य सरकारने दुधाला २७ रुपये प्रतिलिटरचा...
पुण्यात पालेभाज्यांची आवक टिकून; दर...पुणे : मार्केट यार्ड येथील भाजीपाला बाजारात सलग...
साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत...नागपूर : बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91 व्या...
नरभक्षक बिबट्याला अखेर ठार मारलेमेहुणबारे/ पिलखोड/ चाळीसगाव : गिरणा परिसरात...
सरसकट कर्जमाफीसाठी होणार जेल भरो औरंगाबाद  ः शेतकरी, शेतमजूर, शेतीपूरक...
उद्धव ठाकरे गप्प बसा; अन्यथा रहस्ये...सांगली ः शिवसेना सोडण्याचे कारण उद्धव ठाकरे आहेत...
गिरणा धरणातून पहिले आवर्तन सोडलेचाळीसगाव :  गिरणा धरणातून सिंचनासाठीचे पहिले...
पीक नुकसानीचे दहा दिवसांत पंचनामे...औरंगाबाद : कापूस व धान पिकाच्या झालेल्या...
दक्षिण गुजरात, सौराष्ट्राचा कौल मतपेटीत...अहमदाबाद, गुजरात : येथील विधानसभेच्या पहिल्या...
रोहित्र दुरुस्तीचा विलंब भोवला; भरपाई...अकोला :  वीज रोहित्राची वेळेवर दुरुस्ती न...
व्यावसायिक कल्चरमुळे वाढते...खाद्यपदार्थ किण्वनातील जिवाणूंचा झाला अभ्यास...
बोगस बियाणे निर्मितीच्या संशयावरून...बुलडाणा : नांदुरा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर...
कृषि सल्ला : पालेभाज्या, फळभाज्याडिसेंबर महिन्यात बहुतांश पालेभाजी पिकांची लागवड...
औरंगाबादेत कांदा १००० ते ३५०० रुपयेऔरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
मध्यम आकाराचे मांसभक्षक येतील पर्यावरण...मध्यम आकाराच्या मांसभक्षक प्राण्यांवर...