agriculture news in marathi, Sugarcane Drip loan scheme to be start in April | Agrowon

ऊस ठिबक योजनेला एप्रिलपासून सुरवात
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठिबक संचाकरिता तयार केलेल्या दोन टक्के व्याजासह कर्जनिगडित योजनेला एप्रिलपासून सुरवात होणार आहे. एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. 

पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठिबक संचाकरिता तयार केलेल्या दोन टक्के व्याजासह कर्जनिगडित योजनेला एप्रिलपासून सुरवात होणार आहे. एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. 

 ऊस क्षेत्रासाठी आणलेल्या या योजनेत अनुदान नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या सहभागाविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. अनुदान रद्द करून व्याज सवलत देण्याच्या तरतुदीमुळे या योजनेकडे शेतकरी पाठ फिरवण्याची शक्यता असली, तरी साखर कारखान्यांचा सहभाग असल्यास योजनेला प्रतिसाद मिळू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
 
ऊस ठिबक योजनेला अनुदान देण्यात आलेले नाही. मात्र, व्याज सवलत मिळणार आहे. बॅंका सध्या १२ ते १४ टक्के व्याजाने ठिबकसाठी शेतकऱ्यांना कर्ज देतात. शासनाच्या योजनेमुळे शेतकऱ्यांची दहा टक्के व्याज बचत होईल, असा दावा सहकार विभागाचा आहे. सध्या पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेतून राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला ५५ टक्क्यांपर्यंत, तर साधारण गटातील शेतकऱ्याला ४५ टक्क्यांपर्यंत ठिबक संचासाठी अनुदान मिळते. मात्र, कर्जाचा व्याजदर भरमसाठ आहे. 

  ‘उजनी, भीमा, मुळा, टेंभू, हतनूर, ऊर्ध्व काटोल या सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ठिबकद्वारे सिंचन बंधनकारक होणार आहे. पहिल्या टप्प्यात एप्रिलपासून साखर कारखान्यांच्या मदतीने या योजनेला सुरवात होईल. ऊस उत्पादकांना भविष्यात ठिबक सिंचन सक्तीचे होणार आहे. मात्र, तूर्तास ठिबकसाठी सक्तीऐवजी जागृती करून मोहीम राबविण्याकडे शासनाचा कल राहील, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

   अवघ्या दोन टक्के व्याजात लाभ मिळणार
राज्यातील शेतकऱ्यांना बॅंका सव्वासात टक्के दराने ठिबकसाठी कर्ज देतील, मात्र शेतकऱ्याला नव्या योजनेत फक्त दोन टक्के व्याजात ठिबक संच मिळणार आहे. ही योजना २०२४ पर्यंत सुरू राहील. कमी व्याजात ठिबकला कर्ज देण्यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्याच्या वतीने चार टक्के, तर साखर कारखाने सव्वा टक्का व्याज भरेल. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्याला प्रवाही सिंचन पाणीपट्टीत २५ टक्के सवलत मिळेल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
जपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...
कुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...