उत्तर प्रदेशात ११,८५५ कोटी रुपये ऊसबिल थकीत

उत्तर प्रदेशात ११,८५५ कोटी रुपये ऊसबिल थकीत
उत्तर प्रदेशात ११,८५५ कोटी रुपये ऊसबिल थकीत

लखनऊ : उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ११ हजार ८५५ कोटी ६३ लाख रुपयांची देणी अद्यापही बाकी आहे. साखरेला कमी दर असल्याने ऊस बिलापोटीची रक्कमही दिवसेंदिवस वाढत अाहे.  २०१७-१८ या साखर हंगामात उत्तर प्रदेशात विक्रमी गाळप आणि साखर उत्पादन झाले आहे. बाजारात हंगाम सुरू झाल्यापासून साखर दरात घसरण सुरू आहे, याचा परिणाम कारखान्यांच्या साखर विक्रीवर होत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पेेमेंट थकले आहे.  राज्यातील ११९ साखर कारखान्यांनी आत्तापर्यंत यंदा गाळप केले असून, ५६ साखर कारखान्यांची हंगाम समाप्ती झाली आहे. उत्तर प्रदेश साखर कारखाना संघ (उपस्मा) अधिकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ६३.४८ टक्के ऊसबिल पेमेंट शेतकऱ्यांना दिले अाहे. राज्यात ११ मे पर्यंत ३४ हजार ११८ कोटी ८३ लाख रुपये शेतकऱ्यांचे बिलापोटी झाले होते. त्यापैकी २० हजार ६०९ कोटी १३ लाख रुपये शेतकऱ्यांना बिलापोटी अदा करण्यात आले, तर एकूण ११ हजार ८५५ कोटी रुपये देणे अद्याही बाकी आहे. यापैकी ९४ खासगी साखर कारखान्यांनी १० हजार ७२७ कोटी ३७ लाख रुपये, तर २४ सहकारी साखर कारखान्यांकडे ११०७ कोटी ९ लाख आणि एक महामंडळ कारखान्यास २१.१७ कोटी रुपये शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत. आश्चर्यकारक म्हणजे गेल्या २०१६-१७ या गाळप हंगामातील ५९.५९ कोटींची थकीत रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे.  यंदाच्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांनी २० हजार ६०९.१३ कोटी रुपये शेतकऱ्यांना ऊसबिलापोटी अदा केले आहेत. यात खासगी कारखान्यांकडून १८ हजार ८६४ कोटी ९६ लाख, सहकारी कारखान्यांकडून १६६३ कोटी ३१ लाख आणि सार्वजनिक कारखान्यांकडून ८० कोटी ८८ लाख रुपये यांचा समावेश आहे.  दरम्यान, देशात महाराष्ट्रानंतर यंदा उत्तर प्रदेशात सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशात ११६३.०८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले असून, १०.८८ साखर उतारा राहिला आहे. एकूण १० हजार ६८८ लाख ८३ हजार उसाचे गाळप आत्तापर्यंत झाले आहे. अजूनही अर्ध्याअधिक साखर कारखान्यांचे गाळप असूनही सुरू असून, साखर उत्पादन वाढणार आहे. गेल्या हंगामात राज्यात ९०४१.४३ लाख क्विंटल उसाचे गाळप होऊन ९९०.६२ लाख क्विंटल साखरेचे या काळात उत्पादन झाले होते. 

उत्तर प्रदेशातील एकूण ऊस देणी आणि थकबाकी (रक्कम कोटीत)
विभाग एकूण देणी दिलेली रक्कम थकबाकी
महामंडळ ११४.७५ ८०.८८ २१.१७
सहकारी २९२६.६४ १६६३.३१ ११०७.०९
खासगी ३१०७७.४४ १८८६४.९४ १०७२७.३७
एकूण ३४११८.८३ ३२४६४.७६ ११८५५.६३
स्रोत : उपस्मा 
उत्तर प्रदेशातील एकूण गाळप (११ मेपर्यंत)
कारखाने एकूण हंगाम समाप्ती गाळप  (लाख/टन) साखर उत्पादन (लाख/क्विं) उतारा  (%)
महामंडळ ३५.७० ३.६२ १०.१५
सहकारी २४ ११ ९१६.५४ ९०.१५ ९.८४
खासगी ९४ ४५ ९७३६.४५ १०६९.३१ १०.९८
एकूण ११९ ५६ १०६८८.६९ ११६३.०८ १०.८८
स्रोत : उपस्मा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com