agriculture news in marathi, sugarcane farmer suffer loss while faulty weighing | Agrowon

काटामारी रोखण्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष
टीम अॅग्रोवन
रविवार, 3 डिसेंबर 2017

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांमध्ये होणारी काटामारी रोखण्यासाठी साखर आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची अनेक जिल्ह्यात अंमलबजावणी होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील साखर कारखान्यांकडून यंदा ६५० लाख टन ऊस गाळप केला जाणार आहे. मात्र, कारखान्यांमध्ये वजन करण्याची पद्धत संशयास्पद असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे, असे ऊस उत्पादकांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांमध्ये होणारी काटामारी रोखण्यासाठी साखर आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची अनेक जिल्ह्यात अंमलबजावणी होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील साखर कारखान्यांकडून यंदा ६५० लाख टन ऊस गाळप केला जाणार आहे. मात्र, कारखान्यांमध्ये वजन करण्याची पद्धत संशयास्पद असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे, असे ऊस उत्पादकांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

कारखान्यांच्या काटेमारीविरोधात सहकार मंत्रालयापासून ते साखर आयुक्तालयापर्यंत तक्रारी आलेल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी साखर संकुलसमोर बळिराजा शेतकरी संघटनेचे नेते बी. जी. पाटील यांनी उपोषण करून या समस्येकडे लक्ष वेधले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनीही काटेमारी विरोधात आवाज उठवला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांनी काटेमारीची गंभीर दखल घेतली. त्यानंतर राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना काटेमारीच्या विरोधात भरारी पथके स्थापन करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले. मात्र, त्याचा परिणाम अजूनही काही जिल्ह्यांमध्ये दिसत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

'काटेमारीच्या विरोधात फक्त नगरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी तातडीने भरारी पथक स्थापन केले. यामुळे शेतकऱ्यांनादेखील दिलासा मिळाला आहे. नाशिक आणि सातारा जिल्ह्यात पथके स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, इतर ऊस उत्पादक जिल्ह्यांत पथके स्थापन झाली किंवा त्यात काय अडचणी आहेत, याविषयी इतर कोणत्याही जिल्ह्यांतून महसूल विभागाने अहवाल पाठविलेला नाही, असे सहकार विभागाचे म्हणणे आहे.

या पथकात वैधमापन शास्त्र विभाग, पोलिस, महसूल आणि प्रादेशिक साखर सहसंचालकांचा समावेश आहे. मात्र, कोणी काय करायचे याची जबाबदारी निश्चित नसल्यामुळे राजकीय भुंगा पाठीमागे लागू नये म्हणून कोणताही विभाग पुढाकार घेण्यास तयार नाही, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

शेतकरी, मजूर आणि वाहतुकदारांनाही फटका
काटेमारीच्या विरोधात शासनाकडे पाठपुरावा करणारे ऊस उत्पादकांचे प्रतिनिधी बी. जी. पाटील म्हणाले, ‘एका टनामागे 200 ते 250 किलोचा काटा मारला जातो. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये शेतकऱ्याने ऊस पाठविल्यानंतर काही ठिकाणी ट्रॉली आठ टनांची भरते. मात्र, कर्नाटकात हीच ट्रॉली साडेदहा टनांची भरते. कमी ऊस दाखविल्यामुळे शेतकऱ्याचे पेमेंट आपोआप कापले जाते. मजुरांनादेखील कमी मजुरी आणि वाहतुकदारांनाही भुर्दंड होतो. मात्र, कारखान्यांच्या भीतीपोटी कोणाही तक्रार करीत नाही.'

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्तगेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रामध्येही...
कृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...
बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त...मुंबई : राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान...
लाळ्या खुरकूत लस पुरवठा विलंबाच्‍या...पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या...
कोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची...महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य...
नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास...वातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या...
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या...नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य...
हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या...अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात होणार दोन हजार ९६ पीक... पुणे   ः रब्बी हंगामातील पिकांची...
पुणे जिल्ह्यात ११ हजार कांदा चाळींची...पुणे  ः कांद्याचे अधिक उत्पादन झाल्यास...
तेवीस कारखान्यांकडून ७७ लाख ६३ हजार टन... औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
पुढील महिन्यापासून ‘समृद्धी’चे काम... वाशीम : नागपूर-मुंबई कृषी समृद्धी जलदगती...
‘वैद्यनाथ साखर’चा परवाना दहा दिवसांसाठी... बीड : अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या तपासणीत...
शेतीकामासाठी सालगड्यांची कमतरताअमरावती  ः गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन...
राज्यात ‘जलयुक्त’साठी २०८ कोटींचा निधीनगर ः दुष्काळमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या...
वीजजोडणीसाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा...नगर : पैसे भरल्यानंतर वारंवार मागणी करूनही...
चिंचेचे उत्पादन २० टक्क्यांनी वाढणारसांगली : चवीने आंबट असणारी चिंच यंदा गोड झाली आहे...
परभणी, नांदेड जिल्ह्यांतील २०१७ गावांना...परभणी : २०१७-१८ च्या खरीप हंगामातील पिकांची...
जलयुक्तच्या कामांना टक्केवारीचे ग्रहणअकोला ः जलयुक्त शिवार योजनेला जसजसा अधिक कालावधी...
कृषी पर्यटनाला मिळणार जुन्नर तालुक्यात...पुणे: आैद्याेगिक विकासाला मर्यादा असल्याने...