Agriculture News in Marathi, Sugarcane Farmers agitation, Nagar district | Agrowon

ऊसदरप्रश्नी वांबोरीला काटा बंद अांदोलन
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017
राहुरी, जि. नगर : ऊसदरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वांबोरी येथे शुक्रवारी (ता.२४) प्रसाद शुगर मिलचा काटा बंद करून अांदोलन करण्यात अाले.
राहुरी, जि. नगर : ऊसदरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वांबोरी येथे शुक्रवारी (ता.२४) प्रसाद शुगर मिलचा काटा बंद करून अांदोलन करण्यात अाले. उसाला ३४०० रुपये भाव जाहीर करावा, या मागणीसाठी आंदोलकांनी एल्गार केला.
 
संघटनेचे तालुकाध्यक्ष रवी मोरे यांचे नेतृत्वाखाली हे अांदोलन करण्यात अाले. सकाळपासून आंदोलक कारखान्याजवळ ठिय्या देऊन होते. त्यामुळे वजन काटा बंद राहिला. दरम्यान, शनिवारपर्यंत एका दिवसाची मुदत द्यावी, भाव जाहीर करू, अशी भूमिका प्रसाद शुगरचे अध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी घेतली व आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु आंदोलक त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. परिणामी काटा बंदच राहिला.
 
संघटनेचे कार्यकर्ते राहुरी बाजार समितीत एकत्र आले व त्यांनी त्यांचा मोर्चा प्रसाद शुगर मिलकडे वळविला. तेथे चोख पोलिस बंदोबस्त होता. राज्य राखीव दलाचे पथकही हजर होते. प्रवेशद्वाराजवळ आंदोलकांना अडविले गेले. परंतु, आंदोलकांनी दार तोडून आत प्रवेश केला. त्यांनी त्यांचा मोर्चा वजन काट्याकडे नेला.
 
तेथे आंदोलक बसून राहिले. आंदोलकांसमोर रवी मोरे, प्रकाश देठे, सुनील इंगळे, दिनेश वराळे यांची या वेळी भाषणे झाली. आंदोलन सुरू झाल्यावर अध्यक्ष प्राजक्त तनपुरे तेथे आले. आपण आज संचालकांची बैठक घेऊन शनिवारी भाव जाहीर करू, असे त्यांनी सांगितले. पण आंदोलक त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आजच भाव जाहीर करावा असा आंदोलकांचा आग्रह होता. ३४०० रुपये दर जाहीर केला तर लगेचच आंदोलन मागे घेऊ, असे रवी मोरे म्हणाले. 
 
सध्या साखरेचे दर कमी होत आहेत. त्याची काहीही शाश्वती नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखरेचे भाव पडत आहेत. हे आंदोलन आमदार, खासदार यांचे घरासमोर केले पाहिजे, असा इशारा या वेळी देण्यात अाला. या वेळी जोरदार घोषणाबाजी झाली. बराच वेळ आंदोलन सुरू होते.
 
या आंदोलनात संदीप शिरसाठ, विजय तोडमल, प्रमोद पवार, राहुल करपे, सुभाष वने, सुरेश बोरावके, सतीष दाबाडे, विशाल तारडे, सतीष पवार, अच्युत बोरकर, पोपट तारडे, भागवत तारडे, अरुण डोंगरे, प्रदीप पवार, राहुल पवार आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...
शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील...सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद...
कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध...नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी...
'मतदान झालेल्या दुष्काळी भागात ...मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन...
उच्चांकी मतदानामुळे कोल्हापूर मतदारसंघ...कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...