Agriculture News in Marathi, Sugarcane Farmers agitation, rahuri, Nagar district | Agrowon

ऊस उत्पादकांच्या मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी’चा रास्ता रोको
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

राहुरी, जि. नगर : ऊस उत्पादकांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. १०) नगर- मनमाड राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

नगर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने उसाला प्रतिटन ३४०० रुपये दर जाहीर करत नाहीत, तोपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उसाला कोयता लावू देऊ नये, असे आवाहन या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले. दोन दिवसांत निर्णय न घेतला गेल्यास पालकमंत्री व साखर कारखानदारांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा संघटनेच्या रास्ता रोको आंदोलनात दिला गेला.

राहुरी, जि. नगर : ऊस उत्पादकांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. १०) नगर- मनमाड राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

नगर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने उसाला प्रतिटन ३४०० रुपये दर जाहीर करत नाहीत, तोपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उसाला कोयता लावू देऊ नये, असे आवाहन या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले. दोन दिवसांत निर्णय न घेतला गेल्यास पालकमंत्री व साखर कारखानदारांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा संघटनेच्या रास्ता रोको आंदोलनात दिला गेला.

याबाबत निवासी नायब तहसीलदार सी. जी. तळेकर व पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांना आंदोलकांनी निवेदन दिले. सकाळी राहुरी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने नगर- मनमाड राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन झाले. आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राहुरी तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केले.

या वेळी बोलताना श्री. मोरे म्हणाले, की नगर जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी गळीत हंगामास प्रारंभ केला आहे. मात्र, कोणत्याही साखर कारखान्याने अद्याप ऊसदर जाहीर केलेला नाही, त्यामुळे ऊस उत्पादक संभ्रमावस्थेत आहेत. नेमका किती भाव देणार हे समजले पाहिजे.

वाढलेला खर्च लक्षात घेता सर्व कारखान्यांनी त्वरित प्रतिटन ३४०० रुपये भाव जाहीर करावा. तसेच, उसाचे वजन कमी येत असल्याची शेतकऱ्यांची भावना असल्याने कारखान्यांनी वजन व त्यापोटी मिळणारे पेमेंट ऑनलाइन करावे. ऊसतोड झाल्यापासून १५ दिवसांत पेमेंटची सर्व रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात जमा करावी. मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढविली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

या वेळी प्रकाश देठे, दिनेश वराळे, अरुण डौले, सुमीत इंगळे, देवेंद्र लांबे यांचे भाषण झाले. या आंदोलनामुळे राज्यमार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. या आंंदोलनात सुभाष वने, संग्राम धुमाळ, किशोर भिंगारकर, प्रवीण पवार, सुनील इंगळे, सतीश पवार, सचिन म्हसे, सचिन पवळे, प्रशांत पवार, प्रमोद पवार, सचिन पवार, भगीरथ पवार आदी सहभागी झाले होते.

गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात का दर नाही?
गुजरातमध्ये उसाला ४७०० रुपये, उत्तर प्रदेशमध्ये ३५०० रुपये प्रतिटन भाव दिला जातो, मग महाराष्ट्रात त्याप्रमाणे भाव का मिळत नाही, असा खडा सवाल आंदोलकांनी या वेळी उपस्थित केला.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...