Agriculture News in Marathi, Sugarcane Farmers agitation, Solapur district | Agrowon

ऊसदर आंदोलनात आता मनसेचीही उडी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

सोलापूर ः ऊसदराचे आंदोलन दिवासेंदिवस तापतच चालले आहे. आता शेतकरी संघटनांबरोबर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आंदोलनात उडी घेतली आहे, मनसेने गुरुवारी (ता. १६) माळशिरस येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन विनाकपात २७०० रुपये दर द्यावा, यासाठी रस्ता रोको आंदोलन केले.

सोलापूर ः ऊसदराचे आंदोलन दिवासेंदिवस तापतच चालले आहे. आता शेतकरी संघटनांबरोबर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आंदोलनात उडी घेतली आहे, मनसेने गुरुवारी (ता. १६) माळशिरस येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन विनाकपात २७०० रुपये दर द्यावा, यासाठी रस्ता रोको आंदोलन केले.

पक्षाचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, उपाध्यक्ष मदन माने देशमुख, तालुकाध्यक्ष सुरेश टेळे, सरचिटणीस अप्पा करचे, कार्याध्यक्ष कुंडलिक मगर, बाबा ननावरे, सुरेश वाघमोडे, शशिकांत पाटील, सिद्धेश्वर गरड, अनिल बागल, अर्जुन जाधव, महेश पवार, संतोष देवकते, महिला आघाडी तालुका अध्यक्ष मंगलाताई चव्हाण यांच्या नेत्तृत्वाखाली माळशिरसच्या मुख्य चौकात सकाळी हा रास्ता रोको करण्यात आला.

दरम्यान, ऊसदराच्या या प्रश्नावर रयत क्रांती संघटनेने दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषाणाला सुरवात केली आहेच. पण आता जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनीही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्यासमोर उपोषणाला सुरवात केली आहे.

आंदोलनाची ही धग काही केल्या कमी होत नाही, कारखानदार मात्र सहकारमंत्री, साखर आयुक्त कार्यालयाकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे हा प्रश्न चिघळत जाण्याची शक्यता आहे.

इतर ताज्या घडामोडी
यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या...भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस...
मराठवाड्यासाठी २० सौरऊर्जा प्रकल्पांना... लातूर ः मराठवाड्यातील विजेची गरज लक्षात घेऊन...
तयारी हळद लागवडीची...हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची...
सांगली जिल्ह्यात खंडित वीजपुरवठ्याने... सांगली  : कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी...
मराठवाड्यातील ३२१ गावांना ३९६...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत...
मिरजगाव येथे यंत्रणा सुरळीत, मात्र... नगर : तूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन...
नांदेड विभागातील २४ कारखान्यांचा गाळप... नांदेड :  नांदेड विभागातील यंदा गाळप सुरू...
व्यापाऱ्यांकडून फसवणूक : मनमाड बाजार...मनमाड, जि. नाशिक  : मनमाड कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव येथे आंबा ४५०० ते ८००० रुपये... जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कृषिपंपांच्या वीज थकबाकीवरून...मुंबई  ः सुमारे २३ हजार कोटी रुपयांच्या कृषी...
आमदार-खासदारांची धोरणे व्यापारीहिताचीपरभणी  ः आमदार-खासदारांनी संघटित होऊन...
पीकविमा परताव्यासाठीचे अन्नत्याग आंदोलन...परभणी  ः जिल्ह्यातील पीकविमा परताव्यापासून...
गुजरातमध्ये उन्हाळी पीक लागवड क्षेत्रात...मुंबई : सरदार सरोवर प्रकल्पातील कमी ...
`जलयुक्त`साठी पुणे जिल्ह्यातील 221...पुणे  ः पाणीटंचाई कमी करण्यासाठी राज्य...
नगर जिल्ह्यात ‘नरेगा’तून साडेसहा हजार... नगर  ः ग्रामीण भागात मजुरांना रोजगार...
मराठवाड्यातील लघू प्रकल्पांत १४ टक्के... औरंगाबाद  : एकीकडे उष्णतेचे प्रमाण वाढत...
बुलडाण्यातील सात हजारांवर कृषिपंपांची... बुलडाणा  ः जिल्ह्यात सद्यःस्थितीत सात...
बुलडाण्यात सोयाबीन क्षेत्र वाढण्याची... बुलडाणा  ः गेल्या हंगामात बीटी कपाशीवर...
कोल्हापूर जिल्ह्यातील गाळप हंगाम आटोपला कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप...
तीन लाख ७२ हजार टन खतसाठा तीन...परभणी :  नांदेड, परभणी, हिंगोली...