agriculture news in marathi, sugarcane farmers protest against due payment in Atpadi, sangli | Agrowon

आटपाडीत थकीत ऊसबिलप्रकरणी शेतकऱ्यांचा मोर्चा
टीम अॅग्रोवन
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

आटपाडी, जि. सांगली ः माणगंगा साखर कारखान्याची थकीत उसबिले तातडीने द्यावीत, यासाठी शनिवारी (ता. १०) शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान सभेने मोर्चाचे आयोजन केले होते. शेतकऱ्यांना ऊसबिले लवकरच दिली जातील, असे आश्‍वासन कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी दिले.

आटपाडी, जि. सांगली ः माणगंगा साखर कारखान्याची थकीत उसबिले तातडीने द्यावीत, यासाठी शनिवारी (ता. १०) शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान सभेने मोर्चाचे आयोजन केले होते. शेतकऱ्यांना ऊसबिले लवकरच दिली जातील, असे आश्‍वासन कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी दिले.

माणगंगा साखर कारखान्याची उसाची बिले गेल्या वर्षीसह थकली आहेत. त्यासाठी आनेक दिवसांपासून शेतकरी विविध भागांतून कारखान्यावर हेलपाटे मारत होते. गेल्या दहा दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यावर दगडफेक करून तोडफोड केली होती. त्याननंतर आंदोलकावर कारखान्याने गुन्हे दाखल केले होते. स्वभिमानी शेतकरी संघटना आणि किसान सभेने मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाकडे तालुक्‍याचे लक्ष लागले होते. मोर्चाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे महेश खराडे आणि किसान सभेचे अरुण माने यांनी केले होते.

बस स्थानकापासून मोर्चाची सुरवात झाली. मुख्य पेठेतून बाजार पटांगणमार्गे तहसील कार्यालयावर घोषणा देत मोर्चा गेला. तेथे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्रअण्णा देशमुख, उपाध्यक्ष भगवान मोरे, प्रभारी कार्यकारी अधिकारी नामदेव मोटे, पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख यांच्यासोबत आंदोलकांची सकारात्मक चर्चा झाली. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष श्री. देशमुख यांनी मोर्चात सहभागी झालेल्या सत्तर शेतकऱ्यांची ऊसबिले २० फेबुवारीपर्यंत तसेच उर्वरित शेतकऱ्यांची ५ मार्चला बिले देण्याचे आश्‍वासन दिले. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, सातारा जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, ॲड. सचिन सातपुते, सुदर्शन वाडकर, संजय डेढे, राहुल बिडवे, अनिल बिराजदार आदी सहभागी झाले होते.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...