सोलापुरातील कारखान्यांकडे ‘एफआरपी’चे ९९७ कोटी थकले

शेतकऱ्यांनी ऊस संबंधित साखर कारखान्यांना गाळपासाठी दिल्यापासून १५ दिवसांत एफआरपीची रक्‍कम देणे बंधनकारक आहे. परंतु, बऱ्याच कारखान्यांनी एफआरपीची रक्‍कम शेतकऱ्यांना दिली नाही. त्या कारखान्यांची साखर अथवा मालमत्ता ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करून एफआरपीची रक्‍कम वसूल करण्यात येईल. - शशिकांत घोरपडे, प्रादेशिक सहसंचालक, साखर विभाग.
ऊस गाळप हंगाम
ऊस गाळप हंगाम

सोलापूर  : यंदाच्या हंगामात उसाचे गाळप केलेल्या जिल्ह्यातील ३० पैकी २५ साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या ‘एफआरपी’चे तब्बल ९९७ कोटी ४९ लाख ३३ हजार रुपये थकले आहेत. त्यामुळे साखर आयुक्‍तांनी या कारखान्यांना नोटीस बजावली असून, सोमवारी (ता. २३) याबाबत सुनावणी होणार आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित दोन कारखान्यांचा त्यात समावेश आहे.

जिल्ह्यातील २५ कारखान्यांकडे कमी-अधिक प्रमाणात एफआरपीची रक्‍कम थकली आहे. त्यामध्ये सहकारमंत्र्यांच्या दोन लोकमंगल साखर कारखान्यांचाही समावेश असून, त्यांच्याकडे सुमारे ४४ कोटी रुपयांची एफआरपीची थकबाकी आहे.

तसेच आदिनाथ कारखान्याकडे आठ कोटी ६६ लाख ७७ हजार रुपये, भीमा कारखान्याकडे चार कोटी ५९ लाख रुपये, सिद्धेश्‍वर कारखान्याकडे ५७ कोटी २८ लाख रुपये, संत दामाजी कारखान्याकडे तीन कोटी ६८ कोटी ८४ रुपये, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याकडे एक कोटी ८९ लाख रुपये, मकाई कारखान्याकडे आठ कोटी ४२ लाख रुपये, कुर्मदास कारखान्याकडे नऊ कोटी रुपये, लोकनेते कारखान्याकडे १२ कोटी ८६ लाख रुपये, दि सासवड शुगरकडे ३५ कोटी ८ लाख रुपये, सिद्धनाथ कारखान्याकडे १० कोटी ७९ लाख रुपये, जकराया शुगरकडे ७९ लाख ४२ हजार रुपये, इंद्रेश्‍वर शुगरकडे अडीच कोटी रुपये, भैरवनाथ शुगर क्र. दोनकडे २२ कोटी २५ लाख रुपये, फॅबटेक शुगरकडे १९ कोटी ३४ लाख रुपये, भैरवनाथ शुगर लवंगीकडे ११ कोटी ७९ लाख रुपये, युटोपियन शुगरकडे ८२ लाख रुपयांची थकबाकी आहे.

तसेच, गोकूळ शुगरकडे ३६ कोटी ४१ हजार रुपये, मातोश्री शुगरकडे २६ कोटी ५९ लाख रुपये, शिवरत्न उद्योग, आलेगावकडे १५ कोटी ८३ लाख रुपये, बबनराव शिंदे कारखान्याकडे २३ कोटी ४९ लाख रुपये, जयहिंद शुगरकडे दोन कोटी रुपये, सीताराम महाराज शुगरकडे तीन कोटी १५ लाख रुपये आणि विठ्ठल रिफाइंड शुगर, पांडेकडे १५ कोटी १४ लाख रुपये आदी २५ साखर कारखान्यांकडे एकूण ९९७ कोटी ४९ लाख ३३ हजार रुपयांची थकबाकी आहे.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे, पांडुरंग, श्री विठ्ठल, विठ्ठलराव शिंदे आणि विठ्ठल कॉर्पोरेशन या पाच कारखान्यांनी त्यांच्याकडील एफआरपीची देणी दिली आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com