सातारा जिल्ह्यात ८२ हजार हेक्‍टरवरील ऊस उपलब्ध

गाळपासाठी ८२ हजार हेक्‍टरवरील ऊस उपलब्ध
गाळपासाठी ८२ हजार हेक्‍टरवरील ऊस उपलब्ध

सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम गतवर्षीप्रमाणे लांबणार आहे. जिल्ह्यात आगामी गाळप हंगामासाठी ८२ हजार ४८४ हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत उसाचे क्षेत्र वाढले असले तरी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी साखर कारखान्यांकडून हंगामाच्या सुरवातीपासून उसाची पळवापळवी सुरू होणार आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगामाची तयारी सुरू केली आहे. सर्वच कारखान्यांकडून ऊसतोडणी यंत्रणा सक्षम करण्यासाठी ऊसतोडणी टोळ्या; तसेच टॅक्‍ट्ररचे करार करून ॲडव्हान्स देण्यात आले आहेत. काही कारखान्यांनी बॅायलर पूजन केले आहे. उसाचे क्षेत्र जास्त असल्याने राज्य शासनाकडून एक अॅाक्टोबरपासून गाळप परवाने दिले जाणार आहेत. यामुळे बहुतांशी कारखान्यांचे गाळप अॅाक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे.

२०१६-१७ हंगामात ५० हजार ३२६ हेक्‍टर क्षेत्रावरील उसाचे गाळप झाले होते. २०१७-१८ हंगामात ८० हजार ६४४ हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस गाळप करण्यात आला होता. या गाळप हंगामासाठी ८२ हजार ४८४ हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे गतवर्षीप्रमाणे आगामी गाळप हंगाम मे महिन्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली आहे. दोन कारखान्यांची भर पडली असल्याने १७ कारखाने पूर्ण क्षमतेने गाळप करण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातून ऊस नेणे सोपे पडत असल्यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक कारखाने येथून ऊस नेतात. या वेळीदेखील या कारखान्यांकडून ऊस नेला जाणार आहे.

ऊसदर मुद्दा कळीचा ठरणार मागील हंगामांच्या सुरवातीस साखरेचे दर चांगले असल्याने एफआरपी व अधिक दोनशे रुपये हा पॅटर्न साखर कारखान्यांनी मान्य केला होता. सुरवातीस या पॅटर्नप्रमाणे अनेक साखर कारखान्यांनी दर दिले होते. मात्र त्यानंतर साखरेचे दर कमी झाल्याने दरात घट करण्यात आली होती. काही कारखान्यांनी आजपर्यंत बिले दिलेली नाहीत. या कारखान्यांना शेतकरी ऊस देणार नाही. जो कारखाना जास्त आणि वेळेत पैसे देईल अशा कारखान्यांना ऊस दिला जाण्याची शक्यता आहे. जादा दर देणाऱ्या कारखान्यांना ऊस देण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहणार असल्याने याही हंगामात दर हा कळीची मुद्दा ठरणार आहे.

तालुकानिहाय उसाचे क्षेत्र (हेक्‍टर)

तालुका    क्षेत्र
सातारा    १९,२५८.३६
कोरेगाव  १२,५११.६७
खटाव    ४८४९.०७
कऱ्हाड    १८,७९३
पाटण    ३९२३.१६
वाई   १७३४
जावली  ७३८
खंडाळा    २१४५
फलटण   १७,५७३
माण     ९५९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com