agriculture news in marathi, sugarcane issue in South Maharashtra | Agrowon

दक्षिण महाराष्ट्रात उसावर करपा, तांबेऱ्याचा प्रादुर्भाव
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

कोल्हापूर : गेल्या महिन्यात कधी उष्णता तर कधी थंडी असे वातावरण निर्माण झाल्याने त्याचा फटका दक्षिण महाराष्ट्रातील उसाला बसत आहे. नवीन लागवड केलेल्या उसाबरोबरच मोठ्या उसावरही या हवामानामुळे करपा व तांबेऱ्याचा प्रादुर्भाव होत आहे. विशेष म्हणजे नवीन लावणी केलेल्या कोवळ्या उसाच्या पानावरही करपा व तांबेरा दिसत असल्याने या उसाचे भवितव्य अडचणीत आले आहेत.

कोल्हापूर : गेल्या महिन्यात कधी उष्णता तर कधी थंडी असे वातावरण निर्माण झाल्याने त्याचा फटका दक्षिण महाराष्ट्रातील उसाला बसत आहे. नवीन लागवड केलेल्या उसाबरोबरच मोठ्या उसावरही या हवामानामुळे करपा व तांबेऱ्याचा प्रादुर्भाव होत आहे. विशेष म्हणजे नवीन लावणी केलेल्या कोवळ्या उसाच्या पानावरही करपा व तांबेरा दिसत असल्याने या उसाचे भवितव्य अडचणीत आले आहेत.

दक्षिण महाराष्ट्रात उसाचा हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. पहिल्या टप्प्यात उसाची तोड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तातडीने लावणी केलेल्या शेतकऱ्यांच्या उसाची उगवण झाली आहे. ही रोपे कोवळ्या अवस्थेत आहेत. तर आडसाली लागवड झालेले ऊस भरणी करण्याच्या अवस्थेत आहेत. काहीची भरणीही झालेली आहे.

पण कोणत्याही स्वरुपात असलेल्या उसावर करप्या व तांबेऱ्याचा प्रादुर्भाव दिसत असल्याने हवामान स्वच्छ असूनही उसाला मात्र त्याचा फटका बसत असल्याचे चित्र
आहे.

थंडीत सातत्य नसल्यानेच उसाला हवामानाचा फटका बसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याबाबतच्या तक्रारी प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्राकडे येत असून याची माहिती घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी तातडीने शक्‍य असलेल्या ठिकाणी तरी प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, असे आवाहन प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्राच्या तज्ज्ञांनी केले आहे.

कधी उष्ण तर कधी थंडी असे संमिश्र वातावरण असल्याने उसाच्या वाढीत अडथळे येत आहेत. यामुळे करप्या व तांबेऱ्याचा प्रादुर्भाव दिसत आहे. शेतकऱ्यांनी बावीस्टीनची फवारणी एक लिटर पाण्यात एक ग्रॅम या प्रमाणात करावी. स्फुरदची कमतरता असलेल्या जमिनीत प्रामुख्याने रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
- डॉ. अशोक पिसाळ, उस तज्ज्ञ प्रादेशिक
ऊस व गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर

 

गेल्या पंधरा दिवसांपासून आमच्या उसाची पाणी पिवळी पडत आहेत. नवीन लागवड केलेल्या, भरणी झालेल्या उसावरही याचा प्रादुर्भाव दिसत आहे.
- रमेश जाधव, ऊस उत्पादक

इतर बातम्या
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
नांदेड जिल्ह्यात दूध दरासाठी...नांदेड ः जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...