आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४ कोटींचे पेमेंट

एफआरपीसाठी जागरण - गोंधळ आंदोलन
एफआरपीसाठी जागरण - गोंधळ आंदोलन

पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन साखर कारखान्यांनी अखेर ७४ कोटींचे थकीत पेमेंट दिले आहे. मात्र, अजून एका कारखान्याचे पेमेंट न मिळाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्यात आले आहे.  

जय महेश साखर कारखाना (पवारवाडी), छत्रपती सहकारी साखर कारखाना (सावरगाव) आणि लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना (तेलगाव) या कारखान्यांनी उसाचे पेमेंट न दिल्यामुळे मंगळवारी पहाटेपासून शिवसेनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आयुक्तालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.  

याबाबत शिवसेनेचे माजलगाव तालुका प्रमुख अप्पासाहेब जाधव म्हणाले की, छत्रपती साखर कारखान्याने ३१ डिसेंबरपर्यंतचे २६.१७ कोटी रुपये, सोळंके कारखान्याने १५ डिसेंबरपर्यंतचे ४८ कोटी रुपये दिले आहेत. मात्र, महेश कारखान्याने ५८ कोटी रुपयांबाबत काहीही आश्वासन दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आयुक्तालयासमोर शुक्रवारी सकाळी जागरण गोंधळ आंदोलन केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com