agriculture news in marathi, sugarcane plantation area increase,sangli, maharashtra | Agrowon

सांगलीत उसाचे क्षेत्र दहा हजार हेक्‍टरने वाढले
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 जून 2018

सांगली ः जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव, शिराळा तालुक्‍यांत पाण्याची उपलब्धता असल्याने ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. दुष्काळी पट्ट्यात उसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली असल्याचे दिसत असले, तरी गतवर्षीपेक्षा २०१८-१९ मध्ये गाळपाला जाणाऱ्या उसाच्या क्षेत्रात तब्बल ९७४२ हेक्‍टरने वाढ झाली आहे. वाळवा तालुक्‍यात ३२१६ हेक्‍टरने ऊस लागवड क्षेत्र वाढले आहे.

सांगली ः जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव, शिराळा तालुक्‍यांत पाण्याची उपलब्धता असल्याने ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. दुष्काळी पट्ट्यात उसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली असल्याचे दिसत असले, तरी गतवर्षीपेक्षा २०१८-१९ मध्ये गाळपाला जाणाऱ्या उसाच्या क्षेत्रात तब्बल ९७४२ हेक्‍टरने वाढ झाली आहे. वाळवा तालुक्‍यात ३२१६ हेक्‍टरने ऊस लागवड क्षेत्र वाढले आहे.

जिल्ह्यात वाळवा, कडेगाव आणि शिराळा तालुक्‍यांत पुरेसे पाणी उपलब्ध असल्याने आडसाली, पूर्वहंगामी, सुरू या हंगामातील उसाची लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे आले. खोडवा ठेवण्याचे प्रमाणदेखील गतवर्षीपेक्षा वाढले आहे. जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ८० हजार १७६ हेक्‍टर क्षेत्रातील उसाचे गाळप झाले. २०१८-१९ मध्ये होणाऱ्या गाळपासाठी उसाची लागवड पूर्ण झाली आहे. कृषी विभागाने ऊस लागवडीचा अंतिम अहवाल तयार केला असून ८९ हजार ९१८ हेक्‍टर क्षेत्र ऊस लागवडीखाली आले आहे.

तासगाव तालुका तसा द्राक्ष पट्टा म्हणून ओळखला जातो. या तालुक्‍यात पाणीटंचाई आहेच. मात्र यंदा उसाच्या क्षेत्रात ५५० हेक्‍टरने वाढ झाली आहे. जत तालुक्‍यात ५५३ हेक्‍टरने वाढ झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे, अशाच शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली असल्याची माहिती कारखान्यांच्या सूत्रांनी दिली.

दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि खानापूर तालुक्‍यात ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन उशिरा सुरू झाल्याने त्याचा परिणाम ऊस लागवडीवर झाला आहे. या तीन तालुक्‍यांतून २०१७-१८ मध्ये ८३५१ हेक्‍टरवरील ऊस कारखान्यास गाळपासाठी गेला. मात्र २०१८-१९ साठी ६२२६ हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस कारखान्याला गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. याचाच अर्थ असा की, पाणी टंचाई असल्याने या तिन्ही तालुक्‍यांतून २१२५ हेक्‍टरने ऊस क्षेत्रात घट झाली आहे.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात कांदा, लसूण, फ्लॉवरच्या दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
'आणखी साखर तयार कराल, तर खड्ड्यात जाल'विटा, जि सांगली : पाणी आले म्हणून साखरेचे...
शिपायाने घातला शेतकऱ्यांना २२ लाखांला...वर्धा : पशुसंवर्धन विभागाच्या अनुदानावरील...
धान्य पट्ट्यात २०१८मध्ये ४३ शेतकरी...भंडारा : सिंचन, पर्यायी आणि व्यवसायिक पद्धतीविषयी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईचा प्रश्‍न गंभीरपुणे  : जिल्ह्यात पाणीटंचाईबरोबरच...
नांदेड जिल्ह्याला एक लाख क्विंटल...नांदेड : नांदेड जिल्ह्यात २०१९-२० मधील खरीप...
नांदेड जिल्ह्यात हमीभावाने ३८५७ क्विंटल...नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन मूल्य...
खानदेशात मे महिनाअखेरीस कापूस बियाणे...जळगाव  ः खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड...
नांदेड विभागात ७८ लाख टन ऊस गाळपनांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड...
गडहिंग्लज, चंदगड तालुक्यात दहा गावांत...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर  : गडहिंग्लज आणि...
अनुकूल हवामानामुळे यंदा दर्जेदार...सांगली : यंदा बेदाणा निर्मितीसाठी अनुकूल हवामान...
एकतीस वर्षांतही संपले नाही गोसेखुर्द...भंडारा : राज्यकर्त्यांच्या निष्क्रीयतेमुळे...
शेती, शेतकऱ्यांचे हित जपणारे सरकार...फलटण, सातारा : ‘‘लोकसभा निवडणुकीकडे जगाचे...
बागायती कोल्हापूरचा दुष्काळग्रस्तांना...कोल्हापूर : पाणीटंचाईमुळे दूरवरून पाणी आणण्यासाठी...
नागपूर विभागातील प्रकल्पात  उरला १० टक्...नागपूर  : विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये...
यवतमाळ जिल्ह्यात नाफेडची तूर खरेदी बंदयवतमाळ  : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात...
माझे लक्ष्य विधानसभा निवडणूक : राज ठाकरेमुंबई : लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, हे मी...
शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर...नाशिक : शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिलेल्या...
जळगाव जिल्ह्यातील ६७ शाळांना सौर प्रकल्पजळगाव  ः  जिल्हा परिषद शाळांमधील...
नगर मतदारसंघात अठरा लाख मतदार बजावणार...नगर  : नगर मतदारसंघात १८ लाख ५४ हजार २४८...