agriculture news in marathi, sugarcane plantation planning, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात ऊस लागवड वाढण्याची शक्‍यता
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जानेवारी 2018
ऊस पिकाकडे अनेक शेतकरी वळत आहेत. कारण कापसाचे बियाणे पुढे कसे मिळेल, बीटी तंत्रज्ञानाचे काय होईल, असे प्रश्‍न शेतकऱ्यांच्या मनात आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे मुबलक पाणीसाठा आहे, त्यांनी ऊस लागवड केली आहे. 
- उदय पाटील, शेतकरी, चहार्डी, जि. जळगाव.
जळगाव  ः जिल्ह्यात यंदा ऊस लागवडीत काहीशी वाढ होईल असे चित्र असून, सध्या लागवड सुरूच आहे. खासगी साखर कारखान्यांनी ऊस लागवडीसंबंधी बेणे व इतर कार्यवाही सुरू केली आहे. यातच कापसाचे पीक पुढेही बोंड अळीने बाधित होईल, या भीतीने मुबलक पाणीसाठा असलेल्या शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला प्राधान्य दिले आहे. 
 
जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, चाळीसगाव, पाचोरा, मुक्ताईनगर या भागात ऊस लागवड सुरू आहे. जळगाव तालुक्‍यातही नशिराबाद व लगतच्या भागात ऊस लागवड यंदा बऱ्यापैकी झाली आहे. शेतकऱ्यांनी उसासाठी ठिबकचा वापर केला असून, यामुळे कमी पाण्यात चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करताना यंदा दिसत आहेत. 
 
यावल, चोपडा भागातील उसाखालील बहुतांशी क्षेत्र काळ्या कसदार जमिनीचे आहे. काळ्या जमिनीत पाणी किंवा ओलावा धरून ठेवण्याची, तो टिकविण्याची क्षमता अधिक आहे. या भागात फारसे पाणी उसाला लागत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 
 
उसाची लागवड नोव्हेंबरच्या सुरवातीपासून सुरू आहे. अजूनही लागवड सुरू असून, लागवड फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत सुरू राहील, असे चित्र आहे. जिल्ह्यातील उसाचे सर्वसाधारण क्षेत्र ११ हजार हेक्‍टर आहे. यंदा ११ हजार हेक्‍टरपेक्षा अधिक लागवड होईल, अशी माहिती आहे. मागील हंगामात सुमारे साडेनऊ हजार हेक्‍टरवर उस लागवड झाली होती.
 
जिल्ह्यात एक खासगी साखर कारखाना सुरू आहे. धुळे जिल्ह्यालगत नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्‍यात आणखी एक खासगी साखर कारखाना सुरू झाला आहे. नंदुरबारमधील समशेरपूर येथेही एक खासगी साखर कारखाना यंदा सुरू झाला आहे. तसेच गुजरातमधील खासगी कारखानेही जिल्ह्यातील उसावर डोळा ठेऊन आहेत. त्यामुळे उसाला पुढील हंगामात मागणी राहील, हे लक्षात घेता ऊस लागवड वाढत असल्याचे सांगण्यात आले. 

इतर बातम्या
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
‘लॅव्हेंडर’च्या सुगंधाचे जनुकीय...कॅनगन येथील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील प्रो....
बाजारात टंचाईमुळे ‘पांढऱ्या सोन्या'च्या...जळगाव ः देशात कापसाची सर्वाधिक सुमारे ४० लाख हेक्...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
साताऱ्यात मेथी, कोथिंबिरीला प्रतिशेकडा...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यात टंचाई निवारणासाठी...सोलापूर : जिल्ह्यात निर्माण झालेल्या टंचाईवर मात...
दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी पंप...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची...पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू...
विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढलीपुणे ः गुरुवारी (ता. १८) साजऱ्या हाेणाऱ्या...
मराठवाड्यातील लघू, मध्यम प्रकल्पांतील...औरंगाबाद  : दुष्काळाच्या उंबरठ्यावरील...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
शास्वत उत्पन्नासाठी रेशीम उद्योग समजून...औरंगाबाद : शाश्वत उत्पादन व उत्पन्नासाठी नव्याने...
मराठवाड्यात यंदा शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : कमी पाऊस आणि मोठा खंड यामुळे...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
राज्यात २७ लाख हेक्टरवर होणार ज्वारी...पुणे : केंद्र सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणे...
ऊर्जा विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना...मुंबई  : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या व...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...