agriculture news in marathi, sugarcane plantation status, parbhani, maharashtra | Agrowon

परभणी जिल्ह्यात १९ हजार हेक्टरवर ऊस लागवड
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 मार्च 2018
परभणी : जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये १९ हजार ३१० हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. त्यामुळे २०१८-१९ मध्ये खोडवा आणि नवीन लागवड मिळून एकूण २८ हजार १७ हेक्टरवरील ऊस साखर कारखान्यांना गाळपासाठी उपलब्ध होईल.
 
परभणी : जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये १९ हजार ३१० हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. त्यामुळे २०१८-१९ मध्ये खोडवा आणि नवीन लागवड मिळून एकूण २८ हजार १७ हेक्टरवरील ऊस साखर कारखान्यांना गाळपासाठी उपलब्ध होईल.
 
सततच्या दुष्काळामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे जिल्ह्यातील उसाच्या क्षेत्रात घट झाली होती. जायकवाडी डाव्या कालव्याचे पाणी सलग दुसऱ्या वर्षी सिंचनासाठी उपलब्ध झाल्यामुळे या वर्षी जिल्ह्यातील पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अनेक तालुक्यांतील शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक मोडून टाकत त्या ठिकाणी ऊस लागवड केली.
 
कापूस, सोयाबीन आदी पीकांच्या उत्पादनात विविध कारणांनी सातत्याने घट येत आहेत. यंदा जायकवाडी धरण भरले होते. त्यामुळे डाव्या कालव्याचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध झाले. पुढील वर्षीदेखील धरण भरेल, सिंचनासाठी पाणी मिळेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली आहे. अन्य तालुक्यांच्या तुलनेत जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील तालुक्यांतील ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र सिंचन सुविधेअभावी जिंतूर तालुक्यात सर्वांत कमी ऊस लागवड झाली आहे. 
 
जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये सुरू उसाची ८७०६ आणि पूर्वहंगामी उसाची १०,६०४ अशी दोन्ही मिळून एकूण १९,३१० हेक्टवर नवीन ऊस लागवड झालेली आहे. खोडवा उसाचे क्षेत्र ८७०७ हेक्टर आहे. त्यामुळे 
२०१८-१९ मध्ये साखर कारखान्यांना एकूण २८,०१७ हेक्टवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होऊ शकणार आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...