agriculture news in marathi, sugarcane plantation status, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टरवर ऊस होणार उपलब्ध
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 एप्रिल 2018
पुणे ः जिल्ह्यात गेल्या वर्षीपासून ऊस लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झाली आहे. आगामी गळीत हंगामासाठी (२०१८-१९) पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना जवळपास सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना आतापासून आगामी गाळप हंगामाची तयारी सुरू करावी लागणार आहे.  
 
पुणे ः जिल्ह्यात गेल्या वर्षीपासून ऊस लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झाली आहे. आगामी गळीत हंगामासाठी (२०१८-१९) पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना जवळपास सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांना आतापासून आगामी गाळप हंगामाची तयारी सुरू करावी लागणार आहे.  
 
जिल्ह्यात एकूण १८ साखर कारखाने आहेत. यात सहकारी ११ साखर कारखाने आहेत. सहा साखर कारखाने खासगी आहेत. एक साखर कारखाना बंद आहे. या सर्व साखर कारखान्यांचा गाळप हंगाम दरवर्षी आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. त्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करतात.
 
जिल्ह्यात साधारणपणे उसाचे सरासरी क्षेत्र दीड लाख हेक्टर असते. दरवर्षी शेतकरी जुलै ते आॅगस्ट महिन्यात आडसाली ऊसाची लागवड करतात. त्यानंतर साधारणपणे अठरा महिन्यांनंतर ऊस गाळप केले जाते. यंदा जिल्ह्यात जवळपास ४६ हजार ५४० हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. पूर्व हंगामी उसाची लागवड आॅक्टोबर, नोव्हेबर महिन्यात केली जाते.
 
यंदा जिल्हयात पूर्वहंगामी ऊसाची २५ हजार ४९० हेक्टरवर लागवड झाली आहे. या उसाची साधारणपणे १४ महिन्यांनंतर तोडणी केली जाते. सुरू उसाची डिसेंबर ते जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात लागवड केली जाते. यंदा सुरू उसाची १४ हजार १८० हेक्टरवर लागवड झाली असून बारा महिन्यांनंतर त्याची तोडणी केली जाते.
 
गेल्या वर्षी लागवड केलेल्या आणि यंदा गाळप झालेल्या उसाचा खोडवा शेतकऱ्यांनी ठेवला आहे. जिल्ह्यात खोडव्याचे क्षेत्र जवळपास २३ हजार ६७० हेक्टर  आहे. जिल्ह्यात अजूनही साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. त्यामुळे ऊस क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यत जिल्हयात एकूण एक लाख ९ हजार ८८० हेक्टरवर उस उभा आहे. आगामी गाळप हंगामात जवळपास सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळप हंगामासाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती विभागीय साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...