agriculture news in marathi, sugarcane plantation status, sangli, maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात ऊस लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला. पावसाळ्यात सिंचन योजना सुरू होत्या. यामुळे कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्‍यांत पाणी मिळाले असल्याने यंदाच्या हंगामात ऊस लागवडीमध्ये ५ हजार हेक्‍टरने वाढ होण्याची शक्‍यता आहे.
- विलास जाधव, ऊस विकास अधिकारी, क्रांती कारखाना, कुंडल.

सांगली  ः जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात पाऊस चांगला झाला. यामुळे शेतकरी ऊस लागवडीसाठी पुढे आले आहेत. गत वर्षी ऊस लागवडीचे क्षेत्र ७० हजार हेक्टर होते. आता पुढील वर्षी गाळपाला जाणाऱ्या उसाचे क्षेत्र आतापर्यंत ६९ हजार ११५ हेक्‍टरवर पोचले आहे. उसाच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाच हजार हेक्‍टरने वाढ होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती कारखान्यांच्या सूत्रांनी दिली.

यंदाच्या गाळपाला जाणाऱ्या उसाचे सुमारे ७० हजार हेक्‍टरवर क्षेत्र होते. गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला. जलयुक्त शिवार योजनांच्या कामांमुळे पाणीसाठा वाढला. त्यातच पावसाळ्यात पुराच्या वाहून जाणाऱ्या पाण्यातून म्हैसाळ, टेंभू व ताकारी योजना सुरू करून दुष्काळी भागातील तलाव भरून देण्यात आले.

यामुळे जिल्ह्यातील शेतकरी ऊस पिकाची लागवड करण्यासाठी पुढे आले आहेत. जिल्ह्यात पूर्वहंगामामधील उसाची लागवड केली जात आहे. यामुळे पूर्वहंगामातील उसाचे क्षेत्र वाढेल, असा अंदाज कारखान्यांच्या ऊस विकास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षीपेक्षा पुढील वर्षी गाळपाला जाणाऱ्या उसाच्या क्षेत्रात पाच हजार हेक्‍टरने वाढ होईल.

टेंभू, ताकारी म्हैसाळ योजना सुरू करून पावसाळ्यात पुराच्या वाहून जाणाऱ्या पाण्यातून दुष्काळी भागातील तलाव भरून दिल्याने या भागात पाण्याची उपलब्धता झाली होती. यामुळे आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील शेतकरी ऊस लागवडीसाठी पुढे आले आहेत. यामुळे दुष्काळी भागात उसाचे क्षेत्रात वाढू लागले आहे.

टेंभू व ताकारी उपसा सिंचन योजना वास्तविक नोव्हेंबरमध्ये सुरू होते. याच आवर्तनावर या लाभ क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी खोडवाचे नियोजन करतात. पाणी मिळत असल्याने खोडवा घेण्यासाठी शेतकरी पुढे येतात. यामुळे खोडव्याच्या क्षेत्रात वाढ होते. मात्र, या योजनांचे आवर्तन दोन महिन्यांनी उशिरा सुरू झाले. याचा परिणाम उसाच्या खोडव्याच्या क्षेत्रावर होणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
 

इतर ताज्या घडामोडी
फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...
साताऱ्यात शेवगा प्रतिक्विंटल ५००० ते...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे  ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...
वऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...
अमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...
मालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...
सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...
नव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...
पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...
हिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...
संगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
कोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर  : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...
दुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान...मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत...
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...