agriculture news in Marathi, sugarcane planting slightly sown, Maharashtra | Agrowon

देशात ऊस लागवडीत किंचित घट
कोजेन्सिस वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

नवी दिल्लीः देशातील अनेक भागांत दुष्काळी स्थिती असल्याने त्याचा परिणाम ऊस लागवडीवर होईल, असा अंदाज होता. मात्र २०१८-१९ मधील हंगामच्या तुलनेत यंदा केवळ पाच हजार हेक्टरची घट झाली आहे. गेल्या हंगामात ४७ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र उसाखाली होते. यंदा जवळपास ४७ लाख ८५ हजार हेक्टरवर ऊस आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाने दिली. 

नवी दिल्लीः देशातील अनेक भागांत दुष्काळी स्थिती असल्याने त्याचा परिणाम ऊस लागवडीवर होईल, असा अंदाज होता. मात्र २०१८-१९ मधील हंगामच्या तुलनेत यंदा केवळ पाच हजार हेक्टरची घट झाली आहे. गेल्या हंगामात ४७ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र उसाखाली होते. यंदा जवळपास ४७ लाख ८५ हजार हेक्टरवर ऊस आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाने दिली. 

दुष्काळी स्थितीमुळे देशात ऊस लागवड घटली असली, तरीही की महत्त्वाच्या ऊस उत्पादक राज्यांमध्ये लागवड वाढली आहे. उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उसाखालील क्षेत्र वाढले आहे. उत्तर प्रदेशात यंदा विक्रमी २४ लाख हेक्टरवर ऊस लागवड होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात लागवडीत १५.७ टक्के घट होण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशात उच्चांकी लागवड
उसाखालील क्षेत्राचा विचार करता उत्तर प्रदेश मागील तीन वर्षांपासून आघाडीवर आहे. येथे आतापर्यंतची उच्चांकी ऊस लागवड २१ लाख ८० हजार हेक्टरवर झाली आहे. तर मागील हंगामात २१ लाख २० हजार हेक्टरवर लागवड होती. यंदा उत्तर प्रदेशात विक्रमी २४ लाख हेक्टरवर ऊस लागवड होण्याची शक्यता आहे.  

महाराष्ट्रात ऊस लागवडीत १५.७ टक्के घट
महाराष्ट्रातील ऊस उत्पादक पट्ट्यात मागील मॉन्सून हंगामात कमी पाऊस झाल्याने दुष्काळी स्थिती आहे. पाणीटंचाईमुळे ऊस लागवड प्रभावित होऊन मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल १५.७ टक्के लागवड घटली आहे. राज्यात खरीप हंगामापर्यंत आठ लाख ६० हजार हेक्टरवर ऊस लागवड होते. मात्र, गेल्या वर्षी २०१८-१९ मध्ये विक्रमी ११ लाख ६० हजार हेक्टरवर ऊस लागवड झाली होती. परंतु, यंदा लागवडीत १५.७ टक्के घट होऊन उसाखालील क्षेत्र आठ लाखांवर येण्याची शक्यता आहे.

इतर अॅग्रो विशेष
जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोरः...पुणे : मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाचा...
खत आयातीत हेराफेरीपुणे : शेतकऱ्यांना पुरवठा करण्याच्या नावाखाली...
शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला; पण पीकविमा...सोलापूर ः पीकविम्याच्या विषयावर सातत्याने...
मराठवाड्यातील उद्ध्वस्त बागा...औरंगाबाद ः सततच्या दुष्काळानं मराठवाड्यातील...
पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास...नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी...
आयात खाद्यतेलावर १० टक्के विकासकर लावाः...लातूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर...
कापसावरील टोळधाडीने पाकिस्तान धास्तावलासिंध, पाकिस्तान:  पाकिस्थानातील कापूस पीक...
बहुवीध पीक पद्धतीतून चांडोलीच्या...चांडोली खुर्द (जि. पुणे) हे गाव १९८५ पर्यंत...
असाही एक छुपा करनव्वदच्या दशकापासून राबवल्या जात असलेल्या आर्थिक...
शेततळे की गळके भांडेमा  गेल त्याला शेततळे योजनेची सांगड रोजगार हमी...
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग...सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील...
गौरीनंदन ने ठेवले दर्जेदार, भेसळमुक्त...शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील...
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...
एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेतवणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील...
राज्यात मध्यम ते हलक्या सरी पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या...
मराठवाड्यात पिककर्जवाटप केवळ १३...औरंगाबाद : कर्जपुरवठ्याबाबत पुन्हा एकदा ...
‘एचटीबीटी’ लागवडप्रकरणी शेतकरी...अकोला ः जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे लागवड...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...