Agriculture News in Marathi, Sugarcane price control board Meeting, MP Raju Shetti raised FRP Issue, India | Agrowon

‘एफआरपी’पेक्षा कमी भाव देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा
मारुती कंदले
शनिवार, 30 सप्टेंबर 2017
मुंबई : शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा कमी भाव दिलेल्या राज्यातील साखर कारखान्यांवर राज्य सरकारने कारवाई करून फरकाची रक्‍कम शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळावी, अशी आक्रमक मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली.
 
राज्याचे मुख्य सचिव सुमीत मलिक यांच्या अध्यक्षतेखाली ऊस दर नियंत्रण समितीची बैठक गुरुवारी (ता.२८) मंत्रालयात झाली. त्यानंतर ते बोलत होते. या बैठकीला शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी सतीश काकडे आणि साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 
मुंबई : शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा कमी भाव दिलेल्या राज्यातील साखर कारखान्यांवर राज्य सरकारने कारवाई करून फरकाची रक्‍कम शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळावी, अशी आक्रमक मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली.
 
राज्याचे मुख्य सचिव सुमीत मलिक यांच्या अध्यक्षतेखाली ऊस दर नियंत्रण समितीची बैठक गुरुवारी (ता.२८) मंत्रालयात झाली. त्यानंतर ते बोलत होते. या बैठकीला शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी सतीश काकडे आणि साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 
या बैठकीत खासदार शेट्टी यांनी अनेक मागण्यांसंदर्भात मुख्य सचिव सुमीत मलिक यांच्याशी चर्चा केली. त्यांनी अनेक मागण्या सरकारपुढे मांडल्या. 
 
यासंदर्भात माहिती देताना खासदार शेट्टी म्हणाले, की शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनापासून तयार झालेल्या साखरेची विक्री दरमहा ऑनलाइन करावी. ऑनलाइन विक्रीमुळे किमतीत पारदर्शकता राहते. तसेच मागील गाळप हंगामात एफआरपीपेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांवर सरकारने ताबडतोब कारवाई करावी.
 
कोल्हापूर जिल्ह्यातील दौलत साखर कारखान्याने प्रलंबित एफआरपी रक्कम न दिल्याने कारखान्यावर ‘आरआरसी'नुसार कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. साखर नियंत्रणमुक्त असल्याने विक्रीसाठी सरकारने कारखान्यावर बंधन घालू नये, अशी मागणीही केल्याचे त्यांनी सांगितले.
 
गेल्यावर्षीच्या हंगामातील साखरेला जादा दर मिळाला. या जादा दराचे पैसे कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यावेत. भागविकास निधी ५० रुपये व सहवीजनिर्मिती प्रकल्पातील विजेचा १ रुपये २० पैसे कर रद्द करावा, अशाही मागणी करण्यात आल्या. भागविकास निधी आकारणीमुळे ऊस उत्पादकांकडून सुमारे साडेतीनशे कोटी रुपये वसूल केले जाणार आहेत. याला ‘अॅग्रोवन’ने वाचा फोडली होती. 
 
‘थकीत एफआरपीची जबाबदारी मुंढे
यांच्यावर निश्‍चित करा’
तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अकार्यक्षमतेमुळे ‘आयर्न शुगर’च्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्यास दिरंगाई केल्याने या कारखान्याने आपली मालमत्ता गायब केली. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या वसुलीवर झाला. यामुळे थकीत एफआरपीची जबाबदारी तुकाराम मुंढे यांच्यावर निश्‍चित करावी, अशी मागणीही राजू शेट्टी यांनी या वेळी केली.

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्तगेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रामध्येही...
कृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...
बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त...मुंबई : राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान...
लाळ्या खुरकूत लस पुरवठा विलंबाच्‍या...पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या...
कोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची...महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य...
नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास...वातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या...
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या...नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य...
हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या...अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात होणार दोन हजार ९६ पीक... पुणे   ः रब्बी हंगामातील पिकांची...
पुणे जिल्ह्यात ११ हजार कांदा चाळींची...पुणे  ः कांद्याचे अधिक उत्पादन झाल्यास...
तेवीस कारखान्यांकडून ७७ लाख ६३ हजार टन... औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
पुढील महिन्यापासून ‘समृद्धी’चे काम... वाशीम : नागपूर-मुंबई कृषी समृद्धी जलदगती...
‘वैद्यनाथ साखर’चा परवाना दहा दिवसांसाठी... बीड : अन्न व औषधी प्रशासनाने केलेल्या तपासणीत...
शेतीकामासाठी सालगड्यांची कमतरताअमरावती  ः गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन...
राज्यात ‘जलयुक्त’साठी २०८ कोटींचा निधीनगर ः दुष्काळमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या...
वीजजोडणीसाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा...नगर : पैसे भरल्यानंतर वारंवार मागणी करूनही...
चिंचेचे उत्पादन २० टक्क्यांनी वाढणारसांगली : चवीने आंबट असणारी चिंच यंदा गोड झाली आहे...
परभणी, नांदेड जिल्ह्यांतील २०१७ गावांना...परभणी : २०१७-१८ च्या खरीप हंगामातील पिकांची...
जलयुक्तच्या कामांना टक्केवारीचे ग्रहणअकोला ः जलयुक्त शिवार योजनेला जसजसा अधिक कालावधी...
कृषी पर्यटनाला मिळणार जुन्नर तालुक्यात...पुणे: आैद्याेगिक विकासाला मर्यादा असल्याने...