agriculture news in marathi, sugarcane price issue more in debates, Sangli | Agrowon

गावोगावी रंगतेय ऊसदराबाबत चर्चा
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

सांगली : जिल्ह्यातील कारखाने सुरू झाले आहेत. दुसरीकडे उसाला पहिली उचल ३४०० रुपये मिळावी यासाठी शेतकरी संघटनेने ऊसतोंडी बंद केल्या आहेत. उसाला पहिली उचल ३४०० रुपये मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांची देखील आहे. मात्र कारखान्यांनी पहिली उचल किती देणार, याबाबत मौन पाळले असून गावागावांत सध्या ऊसदराची चर्चा रंगत आहे. 

दसरा संपला की, शेतकऱ्यांना वेध लागतात ते उसाच्या दराचे. ऊसपिकासाठी शेतकऱ्यांनी घेतलेली कर्जे, उसणे घेतलेले पैसे परत करण्याचे नियोजन सुरू होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किती दर अधिक मिळेल, याचा अंदाज ऊस उत्पादक शेतकरी बांधू लागले आहेत. 

सांगली : जिल्ह्यातील कारखाने सुरू झाले आहेत. दुसरीकडे उसाला पहिली उचल ३४०० रुपये मिळावी यासाठी शेतकरी संघटनेने ऊसतोंडी बंद केल्या आहेत. उसाला पहिली उचल ३४०० रुपये मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांची देखील आहे. मात्र कारखान्यांनी पहिली उचल किती देणार, याबाबत मौन पाळले असून गावागावांत सध्या ऊसदराची चर्चा रंगत आहे. 

दसरा संपला की, शेतकऱ्यांना वेध लागतात ते उसाच्या दराचे. ऊसपिकासाठी शेतकऱ्यांनी घेतलेली कर्जे, उसणे घेतलेले पैसे परत करण्याचे नियोजन सुरू होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किती दर अधिक मिळेल, याचा अंदाज ऊस उत्पादक शेतकरी बांधू लागले आहेत. 

यंदा आपला कारखाना किती दर देणार, याबाबतही उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे. जिल्ह्यातील कारखाने सुरू झाले आहे. शिवारात ऊसतोडणीत मजूर व्यग्र झाला आहे. मात्र, उसाला पहिली ऊचल देण्याबाबत कारखान्यांनी मौन बाळगले आहे. गुजरातसारख्या राज्यात चार हजार रुपये उसाला दर मिळतो, मग आपल्याकडील साखर कारखाने उसाला अधिक दर का देऊ शकत नाहीत, अशी चर्चा ऊस उत्पादक शेतकऱ्यांत सुरू आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांनीही ३४०० ते ४००० रुपये अशी पहिली उचल मागितली आहे. पहिली उचल ३४०० रुपये मिळालीच पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांचीदेखील आहे. त्यामुळे सरकार ऊसदराबाबत काय भूमिका घेणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

उत्पादनात घटीची शक्‍यता
जिल्ह्यात यंदाच्या गाळपात सुमारे अंदाजे ८० हजार हेक्‍टर क्षेत्र उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा सुमारे ७ हजार क्षेक्‍टरने उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, यंदा वेळेत पाऊस झाला नाही. त्यामुळे ऊसपिकाची अपेक्षित वाढ झाली नाही. उसाच्या क्षेत्रात वाढ होऊनदेखील एकरी उत्पादन घटण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. 

खतांची महागाई अन्‌ उसाला दर नाही
दिवसेंदिवस खते महाग होत आहेत. त्याप्रमाणे ऊसशेती करण्यासाठीही खर्चात वाढ झाली आहे. त्याप्रमाणे उसाची दरवाढ नाही. ऊसदरवाढीसाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाहीत. कारखाना आणि सहकार विभाग यांच्यात सुसुत्रता नसल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...