agriculture news in marathi, sugarcane price, Sadabhau Khot, pune, maharashtra | Agrowon

ऊसदराबाबत बैठक घेण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा आग्रह
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

पुणे : ऊसदराबाबत राज्यासाठी साखर कारखान्यांसोबत येत्या दोन नोव्हेंबरला पुण्यात बैठक घेण्याची तयारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गटाकडून सुरू आहे; मात्र या बैठकीविषयी साखर आयुक्तालय संभ्रमात असल्याचे दिसून येते.  

पुणे : ऊसदराबाबत राज्यासाठी साखर कारखान्यांसोबत येत्या दोन नोव्हेंबरला पुण्यात बैठक घेण्याची तयारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गटाकडून सुरू आहे; मात्र या बैठकीविषयी साखर आयुक्तालय संभ्रमात असल्याचे दिसून येते.  

खासदार राजू शेट्टी यांच्या ऊसदर आंदोलनाची दिशा निश्चित होण्याच्या आधीच शेट्टी गटाला शह देण्यासाठी खोत गटाकडून या बैठकीची तयारी केली जात असल्याचे सांगितले जाते. राज्याचा गाळप हंगाम सुरू करण्यासाठी परंपरेप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक होते. तशी बैठक यापूर्वीच झालेली असून, गाळप हंगाम येत्या एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्याची प्रक्रियादेखील सुरू झालेली आहे. त्यामुळे या बैठकीबाबत साखर आयुक्तालयाकडे अजून कोणतीही सूचना मंत्रालयातून आलेली नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना भेटून पुण्यात साखर कारखानदारांची बैठक घेण्याचा आग्रह धरला होता. मंत्री खोत यांच्या मागणीमुळे खासदार शेट्टी यांच्या ऊसदर आंदोलनाला शह मिळू शकतो. त्यामुळे या मागणीला सहकारमंत्री देशमुख यांनी पाठिंबा देत दोन नोव्हेंबरला बैठक घेण्याचे आश्वासनदेखील खोत यांना दिलेले आहे; मात्र बैठकीचा अधिकृत अजेंडा बाहेर पडल्यामुळे संभ्रम वाढला आहे. 

गेल्या हंगामाच्या तुलनेत उसाच्या किफायतशीर व रास्त दरात (एफआरपी) १०.६ टक्के म्हणजेच प्रतिक्विंटल २५ रुपये वाढ आहे. नवीन हंगामाची बिले आता किमान प्रतिटन २५५० रुपये दराने निघतील; मात्र खोत गटाकडून एफआरपीवर प्रतिटन अजून ३०० रुपये जादा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
कोकणात चांगल्या पावसाची शक्यतामहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४...
ढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...
खरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी...सोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष  जमिनीवर...
नाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...
तिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...
पुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...
मराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...
केळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...
मका, हळद, हरभरा किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी...
पावसाळ्यात टाळा विजेचे धोकेओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात...
डाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...
खानदेशात लाल कांद्याची आवक घटली; दर...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १२२९...नागपूर ः लागवड ते कापणीपर्यंत तंत्रशुद्ध शेती...
बुलडाणा येथे महिलांनी गिरविले बीज...बुलडाणा ः कृषी विभागाची कृषी तंत्रज्ञान...
येवला तालुक्यात कापूस लागवडीला सुरवातनाशिक : मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात विविध...
सांगली : शनिवारपासून पीकविमा खात्यात...सांगली ः पीकविमा योजनेअंतर्गत आंबिया बहर...
नगर : खरिपात साडेपाच लाख हेक्‍टरवर...नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप, रब्बी...
बीडसाठी भरणार मुळा धरणातून टॅंकरराहुरी, जि. नगर : ‘‘मराठवाड्यातील बीड जिल्ह्याची...
रत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेगरत्नागिरी ः वायू चक्रीवादळाचा परिणाम सलग तिसऱ्या...