agriculture news in marathi, the sugarcane prices will HIKE after sugarcanes get increase prices ः Arun Lad | Agrowon

साखरेचा हमीभाव वाढला, तरच उसाला दर मिळेल ः अरूण लाड
टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

कुंडल, जि. सांगली ः शासनाने साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल ३ हजार ५०० करावा तरच शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त दर देणे शक्‍य होईल, असे मत क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड यांनी व्यक्‍त केले. कुंडल (ता. पलूस) येथील क्रांती कारखान्याच्या २२ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाले.

कुंडल, जि. सांगली ः शासनाने साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल ३ हजार ५०० करावा तरच शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त दर देणे शक्‍य होईल, असे मत क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड यांनी व्यक्‍त केले. कुंडल (ता. पलूस) येथील क्रांती कारखान्याच्या २२ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाले.

अरुण लाड म्हणाले, कारखान्याने ऊस नोंदणी व तोडणी यंत्रणा अद्ययावत केली आहे. त्यामुळे नोंदणी आणि तोडणीमध्ये पारदर्शकता आली आहे. जास्तीत जास्त कागदाशिवाय काम केले जात आहे. शेतीचे तुकडे झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी कारखान्याचा ऊस विकास विभाग सर्वतोपरी मदत करत आहे. पायलट योजनेतून शेतकऱ्यांना सर्व निविष्ठा पुरवित आहे. यातून आपली आर्थिक उन्नती साधावी.

यावर्षी कारखान्याची एफआरपी २७७५ रु. आहे. परंतु आपण शेतकऱ्यांना २९५५ रु. दर देणार आहोत. कारखान्याने १०.५० मेगावॅट वीज वीजवितरण कंपनीला देऊ केली आहे. यावर्षी नव्याने सुरू होत असलेला आसवणी प्रकल्प हा अद्ययावत स्वरूपाचा आहे. हा प्रकल्प प्रदूषण मुक्‍त असा उभारण्यात आला आहे. मोलॅसिस पासून जे इथेनॉलनिर्मिती होते त्याला योग्य भाव मिळणे आवश्‍यक आहे.

या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप पाटील, उदय लाड, किरण लाड, शरद लाड, सरपंच प्रमिला पुजारी, दिलीप लाड, आर. के. सावंत पाटील, हणमंत लाड, व्ही. डी. पाटील, व्ही. वाय. पाटील, भिमराव महिंद, वसंतराव लाड, कुंडलिक एडके, योगेश लाड, सर्जेराव पवार, संदीप पाटील, हिम्मत पवार, उपस्थित होते.

इतर बातम्या
खानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...
केळीच्या दरात किरकोळ सुधारणाजळगाव : केळीच्या दरात मागील दोन दिवसात अल्प...
`पाण्याच्या टॅंकरला तातडीने मंजुरी द्या`सोलापूर : पाण्याबाबत तक्रारी वाढत आहेत. ग्रामीण...
पाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...
एफआरपीसाठी साखर आयुक्तालयासमोर रसवंती...पुणे ः माजलगाव (जि. बीड) तालुक्यातील लोकनेते...
महाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात...औरंगाबाद  : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न...
नांदेड जिल्ह्यात रब्बीची ११२ टक्के पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या रब्बीमध्ये १...
शेतीतील नवतंत्रज्ञान पोचवण्यासाठी...सोलापूर : "शेतकऱ्यांच्या यशोगाथा लोकांपर्यंत...
पुणे विभागात पाण्याअभावी रब्बी पिके...पुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी पेरणीच्या...
लातूर बाजारात व्यापारी, अडते संघर्ष...लातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
राज्यस्तरीय तांत्रिक समिती मूग गिळून...पुणे   : केंद्र शासनाच्या मूळ योजनेतून...
विदर्भात थंडीचा कडाका वाढला  पुणे  : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...
राज्य सहकारी बँकेला  १०० कोटींचे...मुंबई  : राज्य शासनाने राज्य सहकारी...
‘कृषी’ला ना पूर्णवेळ मंत्री, ना सचिवमुंबई  : राज्याच्या कृषी खात्याच्या...
`कार्यक्षम पाणी वापरात शेतकऱ्यांचे...औरंगाबाद  : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून...
मुंबई बाजार समितीत सेवा शुल्कवसुली...मुंबई  : मुंबई बाजार समितीतील सेवा...
शिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः...परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले...
अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ३८५ कोटींचे...मुंबई  : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी...
राज्य सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...मुंबई  : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत...
राज्यातील ७४ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी...पुणे   : राज्यातील ७४ साखर कारखान्यांनी...