agriculture news in marathi, Sugarcane sowing on 51.9 lac heacter, Maharashtra | Agrowon

देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवर
कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

नवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस लागवड कमी करण्याचे आवाहन केले होते. परंतु, त्याचा परिणाम ऊस लागवडीवर झाला नाही. देशात मागील वर्षीच्या तुलनेत ऊस लागवडीत वाढ झाली आहे. मागील वर्षी ४९.९ लाख हेक्टरवर ऊस लागवड झाली होती. यंदा लागवडीत २ लाख हेक्टरने वाढ होऊन ५१.९ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे, अशी माहिती कृषी मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातून मिळाली आहे.

नवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर उत्पादनामुळे अनेक राज्यांतील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस लागवड कमी करण्याचे आवाहन केले होते. परंतु, त्याचा परिणाम ऊस लागवडीवर झाला नाही. देशात मागील वर्षीच्या तुलनेत ऊस लागवडीत वाढ झाली आहे. मागील वर्षी ४९.९ लाख हेक्टरवर ऊस लागवड झाली होती. यंदा लागवडीत २ लाख हेक्टरने वाढ होऊन ५१.९ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे, अशी माहिती कृषी मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातून मिळाली आहे.

दरम्यान, देशातील सर्वच भागांतील ऊस लागवड अंतिम टप्प्यात आहे. तसेच अद्यापही अनेक राज्यांतील लागवडीचे अंतिम अहवाल प्राप्त झाले नाहित, असे कृषी मंत्रालयाने सांगितले. 

देशातील सर्वात मोठ्या साखर उत्पादक उत्तर प्रदेशात यंदा विक्रमी ऊस लागवड झाली आहे. उत्तर प्रदेशात २३.९ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. मागील वर्षी २३ लाख हेक्टरवर ऊस होता. उत्तर प्रदेशात साखर उत्पादनही यंदा विक्रमी होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी राज्यात १२१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा आतापर्यंचे सर्वाधीक म्हणजेच १२५ लाख टन उत्पादन होणार आहे, अशी माहिती ऊस आयुक्त संजय भुसरेड्डी यांनी दिली. 

देशातील दुसरे महत्त्वाचे साखर उत्पादक राज्य महाराष्ट्रात ऊस लागवडीत मागील वर्षीच्या १०.८ लाख हेक्टर क्षेत्रात १५.६  टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्रात यंदा साखर उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत बदलण्याची शक्यता नाही. यंदाही मागील वर्षीएवढे १०६ लाख टन उत्पादन होणार आहे. सुरवातीच्या काळात महाराष्ट्रात १२० लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज होता. मात्र आॅगस्टमध्ये कोल्हापूर आणि सोलापूर या ऊस पट्ट्यात पिकाला पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे येथील उत्पादन वाढणार नसल्याचे कृषी विभागाने जाहीर केले आहे. 

साखर उत्पादनात वाढणार नाही
देशात ऊस लागवड वाढली असली तरीही साखर उत्पादन मागील वर्षाएवढेच राहील. देशातील अनेक भागांत ऊस पिकाला पावसाचा खंड आणि अतिपावसाचा फटका बसल्याने त्याचा परिणाम साखर उत्पादनावर होणार आहे, असे कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. तर, यंदा देशात विक्रमी ऊस लागवड झाल्याने साखर उत्पादनही आतापर्यंचे विक्रमी राहील. यंदा देशात ३२३ लाख टन लाख उत्पादन होण्याचा अंदाज आहे, असे साखर उद्योगातील जाणकारांनी सांगितले. ‘इस्मा’ या संघटनेने देशात यंदा ३५० ते ३५५ लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.  

देशातील महत्त्वाच्या राज्यातील ऊस लागवड                                             (लाख हेक्टरमध्ये)
 

राज्य २०१८-१९  २०१७-१९
आंध्र प्रदेश  १.३७ १.३४
बिहार     २.६८   २.६४
गुजरात १.८३ १.८६
कर्नाटक ४.३८  ४.२७
महाराष्ट्र   १०.८३   ९.३७
तामिळनाडू    १.८३   २.१८
उत्तर प्रदेश   २३.९०    २२.९९

      
   
 
 
 

इतर अॅग्रो विशेष
शेतीचे वास्तव यावे पुढेसंबंधित विभागाकडील उपलब्ध माहिती, आकडेवारी हाच...
कृषी निर्यात दुपटीसाठी ‘राष्ट्रीय धोरण’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील...
मराठवाड्यात महारेशीम अभियानाला सुरवात औरंगाबाद ः रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान...
जळगावमधील सर्वच तालुके दुष्काळीजळगाव : जिल्ह्यातील सर्व गावांची अंतिम पैसेवारी...
परभणीची खरिपाची अंतिम पैसेवारी ४४.६९...परभणी ः परभणी जिल्ह्याची खरीप हंगामाची अंतिम...
औरंगाबादमध्ये २७ डिसेंबरपासून ‘ॲग्रोवन’...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांचे होणार...सोलापूर : यंदाच्या गाळप हंगामात संबंधित...
किमान तापमानात वाढ पुणे  : ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...
विदर्भातील तीन जिल्हा बँकांचे विलीनीकरण...मुंबई: राज्यातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या...
रब्बी कर्जवाटपाचे नियोजन कोलमडलेपुणे  : राज्यात यंदा दुष्काळ, कर्जवसुलीतील...
मराठवाड्यातील दुष्काळाची पैसेवारीने...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८५३३...
औषधी जायफळाचे मूल्यवर्धनजायफळ सालीचे वजन ६० टक्के असते. जायफळ सालीमध्ये...
पीकविम्यासाठी राज्यात तक्रार समित्या...पुणे : पीकविमा देताना कंपन्यांकडून होणारी लूट होत...
अल्पभूधारक कुटुंबाच्या आयुष्यात...पारंपरिक पिकांना पूरक व्यवसायांची जोड दिली तर...
कलमे, रोपबांधणी कलेचे रोजगारात केले...औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्‍यातील रजापूर...
कांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...
‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...
देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...
कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...