agriculture news in marathi, Suggest another alternative to 'Vasaka': MLA is Aaher | Agrowon

‘वसाका`बाबत दुसरा पर्याय सुचवा : आमदार आहेर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

कळवण, जि. नाशिक : ‘‘वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास देण्याऐवजी दुसरा कोणताही सक्षम पर्याय असल्यास सर्वांच्या सहकार्याने त्यासाठी प्रयत्न करण्यास तयार आहोत``, अशी ग्वाही ‘वसाका`चे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली.

‘वसाका`च्या भाडेतत्वावर चालविण्यास देण्यासंदर्भात सध्या कसमादेमध्ये (कळवण-सटाणा-मालेगाव-देवळा) पंचक्रोशीत तर्क वितर्कांना उधान आले होते. त्यामुळे डॉ. आहेर यांनी पत्रकार परिषद घेऊन चर्चांना पूर्णविराम देऊन पर्याय सुचविण्याचे आवाहन केले.

कळवण, जि. नाशिक : ‘‘वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास देण्याऐवजी दुसरा कोणताही सक्षम पर्याय असल्यास सर्वांच्या सहकार्याने त्यासाठी प्रयत्न करण्यास तयार आहोत``, अशी ग्वाही ‘वसाका`चे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली.

‘वसाका`च्या भाडेतत्वावर चालविण्यास देण्यासंदर्भात सध्या कसमादेमध्ये (कळवण-सटाणा-मालेगाव-देवळा) पंचक्रोशीत तर्क वितर्कांना उधान आले होते. त्यामुळे डॉ. आहेर यांनी पत्रकार परिषद घेऊन चर्चांना पूर्णविराम देऊन पर्याय सुचविण्याचे आवाहन केले.

वसाकावर राज्य सहकारी बँकेसह इतर बँकांची देणी, ऊस उत्पादक, कामगार आणि इतर सर्व अशी एकूण ४०२ कोटी देणी असल्याने कोणतीही वित्तीय संस्था कारखान्याला अर्थसाह्य करू शकत नाही. अशा परिस्थितीत राज्य सहकारी बँकेने ‘वसाका` भाडेतत्वाने देण्याचा निर्णय घेतला आहे.

ऊस उत्पादक व कामगारांना त्यांचे पैसे मिळावेत, असा आपला आग्रह होता. त्यापार्श्वभूमीवर राज्य सहकारी बँकेने भाडेतत्वावर कारखाना देत असताना सन २०१७-१८ च्या ऊस उत्पादकांच्या देणीसह कामगार, ऊस वाहतूकदार, ऊस तोडणी कामगार यांना गळीत हंगाम चालू होण्याअगोदर पैसे प्राप्त होणार आहेत. तसेच करारातील अटीनुसार दरवर्षी १ कोटी रुपयांबरोबर राज्य बँकेला देण्यात येणाऱ्या प्रति मेट्रिक टन गाळपापोटी देण्यात येणाऱ्या रकमेच्या ५० टक्के रक्कम कामगारांच्या मागील देणीत देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती डॉ. आहेर यांनी दिली.

विरोधकांनी विरोध करण्यापेक्षा आम्हाला मार्गदर्शन करावे त्यांचे निश्चितच स्वागत केले जाईल. कारखान्यावरील कर्जाची परतफेड झाल्यानंतर संबंधित व्यक्तीचा करार त्यानंतर अवघ्या तीन वर्षांमध्येचे संपुष्ठात येणार आहे. त्यामुळे कारखाना २५ वर्षांसाठी कराराने देण्यात आल्याच्या चर्चेला कोणताही अर्थ नाही, असेही डॉ. आहेर म्हणाले.

या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदार आहेर, संचालक धनंजय पवार, माजी संचालक संतोष मोरे, देवळा बाजार समितीचे सभापती बापूसाहेब देवरे, बाळासाहेब बिरारी, अण्णा पाटील शेवाळे,  महेंद्र हिरे, डॉ. पोपट पगार, राजेंद्र भामरे आदी उपस्थित होते.

इतर बातम्या
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
महावितरणच्या कामात सुधारणा व्हायला हवी...जळगाव ः ‘महावितरण’च्या कार्यपद्धतीबाबत सामान्य...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...