agriculture news in marathi, Suicide attempt after farmers' agitation | Agrowon

शेतकऱ्यांचा आंदोलनानंतर आत्मदहनाचा प्रयत्न
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

राशीन, जि. नगर : कुकडीच्या आवर्तनाचा कालावधी वाढवून राशीन व चिलवडी चारीखालील प्रत्येकी ११ बंधारे भरून मिळावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. १६) ठिय्या व त्यानंतर एक तास रास्ता रोको आंदोलन केले. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येताच पाच शेतकऱ्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, आवर्तनाचा कालावधी चार दिवसांनी वाढविला जाईल, असे लेखी आश्‍वासन मिळाल्यानंतर सुमारे पाच तास सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.

राशीन, जि. नगर : कुकडीच्या आवर्तनाचा कालावधी वाढवून राशीन व चिलवडी चारीखालील प्रत्येकी ११ बंधारे भरून मिळावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. १६) ठिय्या व त्यानंतर एक तास रास्ता रोको आंदोलन केले. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येताच पाच शेतकऱ्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, आवर्तनाचा कालावधी चार दिवसांनी वाढविला जाईल, असे लेखी आश्‍वासन मिळाल्यानंतर सुमारे पाच तास सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले.

‘कुकडी''च्या आवर्तनातील विस्कळितपणा, पाण्याचा कमी दाब, वरील भागात फोडलेला कालवा आदी तक्रारींबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. अधिकारी आंदोलन गांभीर्याने घेत नसल्याचे लक्षात येताच संतापलेल्या शेतकऱ्यांतून संजय काळे, धनंजय जगताप, काका काळे, लक्ष्मण भंडारे, गोरख लाहोर यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने पुढील अनर्थ टळला. आंदोलनाची तीव्रता वाढल्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक सूरज मेढे आंदोलनस्थळी आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी महात्मा फुले चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केले. जोरदार घोषणाबाजीही केली. त्यानंतर ‘कुकडी''चे सहायक अभियंता विकास भोसले यांनी आवर्तनाचा कालावधी चार दिवसांनी वाढविण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन दिले.

आंदोलनात युवक नेते श्‍याम कानगुडे, राजेंद्र देशमुख, संग्राम पाटील, मालोजी भिताडे, गणेश कदम, मारुतराव कानगुडे, शिवदास शेटे, भरत नवले, युवराज हाके, सचिन बर्डे, महादेव जाधव, विलास काळे आदी सहभागी झाले होते.

पोलिस निरीक्षकांची शिष्टाई...

आंदोलकांचे ‘कुकडी''च्या स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये मतभेद होऊन आंदोलन चिघळण्याची स्थिती लक्षात येताच पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी कार्यकारी अभियंता शेंदुरे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची तंबीही दिली. त्यानंतर शेंदुरे यांनी आंदोलनाची दखल घेत आंदोलकांच्या मागण्या मान्य करत असल्याचे सांगितले.

इतर बातम्या
बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...
प्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...
कृषी विद्यापीठ संत्रा बाग छाटणी सयंत्र...नागपूर ः संत्रा छाटणी सयंत्राला संत्रा...
ऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...
ऊसबिल थकल्याने कोलमडले अर्थकारणकोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रात तोडणी झालेल्या...
कापूस उत्पादन ३४० लाख गाठी होणारमुंबई  ः देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...
केंद्राचा अन्नधान्य उत्पादनाचा 'कृषी...पुणे: अन्नधान्य उत्पादनात देशात सर्वांत चांगली...
पेथाई चक्रीवादळ आज धडकणारपुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावत असलेल्या ‘पेथाई...
कृषी विद्यापीठ देणार सेंद्रिय कापसाचा...नागपूर ः सेंद्रिय अन्नधान्यासोबतच येत्या काही...
माणिकडोह धरणातून पाणी सोडण्यासाठी आंदोलनआपटाळे, जि. पुणे ः माणिकडोह धरणातून पाणी सोडण्यात...
कापूस उत्पादकतेत महाराष्ट्र मागेजळगाव : कापूस उत्पादकतेमध्ये राज्य मागील चार...
नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...
वजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यांत झपाट्याने घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८६८ प्रकल्पांतील...
कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...
हमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
साखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...
रताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...
दुष्काळी स्थितीत फळबागांचे व्यवस्थापन...पुणे : यंदा कमी झालेल्या पावसामुळे पुणे विभागात...