बलिप्रतिपदेला शेतकऱ्यांचा महामोर्चा : रघुनाथदादा पाटील

जळगाव : सुकाणू समिती शेतकरी परिषद
जळगाव : सुकाणू समिती शेतकरी परिषद

जळगाव : भाजपातून आउटगोइंग सुरू झाले, त्यांचे दुकान वर्षभरात बंद होईल, नाना पटोले यांनी त्याची सुरुवात केली आहे. कर्जमाफी योजना फसवी, तिचे नाव फोकनाड पंतप्रधान कर्जमाफी योजना करा.  २० ऑक्टोबरला बलिप्रतिपदा आहे, या दिवशीं मोठा मोर्चा काढू, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी येथे दिला. सुकाणू समितीतर्फे आयोजित शेतकरी परिषदेचे आज (ता. २६) येथे आयोजन करण्यात आले. यावेळी रघुनाथदादा पाटील बोलत होते. या परिषदेस खासदार राजू शेट्ठी, आमदार बच्चू कडू, डॉ. अजित नवले, डॉ. बाबा आढाव, कॉ किशोर ढमाले, प्रतिभा शिंदे, अशोक ढवळे, सुशीला मोराळे, जळगाव मविप्रचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. 

अजित नवले म्हणाले :

  • शेतीची धोरणे चुकीची, ऑनलाईन कर्जमाफी अर्जामुळे असंतोष
  • ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देणात होते. आता आकडे सांगा, फडणवीस यांनी फसवणूक केली
  • १ कोटी चार लाख शेतकऱ्यांनी अर्ज ऑनलाईन नोंदविले, ४४ लाख शेतकरी ऑनलाईन प्रक्रियेतून गायब झाले, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांकडे आहे का ?
  • चुकीच्या निकषांमूळे केळी उत्पादकही कर्जमाफीपासून वंचित राहणार
  • अामच्याबाबत अफवा पसरविल्या जातात, आम्ही सारे एक आहोत, देशभर सारे शेतकरी नेते एक होत आहेत
  • कॉ किशोर ढमाले म्हणाले :  कर्जमाफी फसवी, फक्त आकड्यांचा खेळ सुरू आहे, भांडवलदारांची सरकारला अधिक काळजी आहे. सुशीला मोराळे म्हणाले :  ज्यांना परिवार नाही, ते काय कुणाची काळजी करतील अशोक ढवळे :  ४२ टाक्यांनी शेतकरी आत्महत्या वाढल्या, ३०२ चा गुन्हा सरकारवर दाखल करा

    रघुनाथदादा पाटील :

  • भाजपातून आउटगोइंग सुरू झाले, त्यांचे दुकान वर्षभरात बंद होईल, नाना पटोले यांनी त्याची सुरुवात केली आहे
  • कर्जमाफी योजना फसवी, तिचे नाव फोकनाड पंतप्रधान कर्जमाफी योजना करा
  • २० ऑक्टोबरला बलिप्रतिपदा आहे, या दिवशीं मोठा मोर्चा काढू
  • बाबा आढाव :

  • हमीभावाची अमलबजावणी होत नाही, केंद्र व राज्याने याची जबाबदारी घ्यावी
  • १२ लाख बोगस कर्ज माफीचे अर्ज आले हा आकडा चंद्रकांत पाटील यांनी कुठून आणला
  • राजू शेट्टी व रघुनाथदादा एकाच व्यासपीठावर आले, याचा मला आनंद. त्यांनी आता एक भूमिका ठरवावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com