ऊस दरासाठी सुकाणू समितीचे अगस्ती कारखान्याला निवेदन

ऊस दरासाठी सुकाणू समितीचे अगस्ती कारखान्याला निवेदन
ऊस दरासाठी सुकाणू समितीचे अगस्ती कारखान्याला निवेदन

अकोले : उसाला पहिली उचल ३५०० मिळावी, या मागणीसाठी शनिवारी (ता. १८) सुकाणू समितीच्या वतीने अगस्ती सहकारी साखर कारखान्याला निवेदन देण्यात आले. अगस्तीचा उतारा जिल्ह्यातील इतर कारखान्यांपेक्षा जास्त आहे. परिसरातील ऊस उपलब्धता वाढत असल्याने वाहतूक खर्च कमी होतो आहे. अशा पार्श्वभूमीवर अगस्तीने तातडीने ३५०० रुपये पहिली उचल द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.  तालुक्यातील प्रमुख सर्व शेतकरी संघटना, शेतकरी कार्यकर्ते व शेतकरी निवेदन देण्यासाठी या वेळी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. निवेदनावर सकारात्मक विचार करण्यासाठी दोन दिवसांत संचालक मंडळाची तातडीने बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन या वेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. घुले यांनी दिले. संचालक मंडळाच्या वतीने मीनानाथ पांडे व कचरू पाटील शेटे हजर होते.  या वेळी डॉ. अजित नवले, अप्पा आवारी, डॉ. संदीप कडलग, रोहिदास धुमाळ, खंडू वाकचौरे, लालुशेठ दळवी, भाऊसाहेब नवले, विलास आरोटे, विनोद हांडे, शांताराम गजे, दिलीप शेणकर, संपत कानवडे, सोमनाथ नवले, बाळासाहेब वाळुंज, बाळासाहेब घोडके, चंद्रभान आरोटे, सुभाष येवले, आर. डी. चौधरी, विकास वाकचौरे, सुरेश धुमाळ, हिरामण भोत, लक्ष्मण नवले, प्रकाश हासे, उद्धव देशमुख, नंदकुमार वाकचौरे, विकास वाकचौरे, बाळा नेहे, प्रभाकर पाडेकर, भाऊसाहेब भांगरे, अशोक राक्षे आदी शेतकरी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com