agriculture news in marathi, Sukanu Samiti warns government, declares agitation | Agrowon

शेतकरीप्रश्नी १९ मार्चला अन्नत्याग, १ मे रोजी राज्यव्यापी आंदोलन
टीम अॅग्रोवन
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

पुणे : शेतीमालाचा हमीभाव आणि शेतकरी प्रश्‍नांवरचे लक्ष विचलित करण्यासाठी राज्यात जातीय दंगली भडकवण्याचे काम सध्या सुरू आहे, असा आराेप करीत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी विविध संघटनांनी एकत्र येत १९ मार्च राेजी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर अन्नत्याग आंदाेलन करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रदिनी (१ मे)  राज्यव्यापी आंदाेलन करण्याचा ठराव सुकाणू समितीच्या शनिवारी (ता. १०) पुण्यात झालेल्या बैठकीत संमत करण्यात आला.

पुणे : शेतीमालाचा हमीभाव आणि शेतकरी प्रश्‍नांवरचे लक्ष विचलित करण्यासाठी राज्यात जातीय दंगली भडकवण्याचे काम सध्या सुरू आहे, असा आराेप करीत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी विविध संघटनांनी एकत्र येत १९ मार्च राेजी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर अन्नत्याग आंदाेलन करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रदिनी (१ मे)  राज्यव्यापी आंदाेलन करण्याचा ठराव सुकाणू समितीच्या शनिवारी (ता. १०) पुण्यात झालेल्या बैठकीत संमत करण्यात आला.

सुकाणू समितीची बैठक शनिवारी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली. या वेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, शेतककरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, पुणे जिल्हाध्यक्ष शिवाजी नांदखिले, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग रायते, किशाेर ढमाले, प्रा. सुशीला माेराळे, प्रतिभा शिंदे, सचिन धाेंडे, सुभाष काकुले, गणेश जगताप आदी मान्यवर उपस्थित हाेते. 

या वेळी रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘‘शेतकरीप्रश्‍नी लक्ष विचलित करण्यासाठी राज्यात जातीय तेढ निर्माण केली जात आहे. मात्र शेतकऱ्यांनी या षडयंत्राला बळी न पडता, आपली एकी कायम ठेवणे गरजेचे आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांबाबत सर्व शेतकरी संघटना आणि समविचारी संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे. यासाठी १५ फेब्रुवारीपासून संपूर्ण राज्याचा दाैरा करण्यात येणार आहे. या दाैऱ्यानंतर १९ मार्च राेजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदाेलन करण्यात येणार आहे. यानंतर २३ मार्च राेजी हुतात्मा अभिवादन सभा प्रत्येक जिल्‍ह्याच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. यामध्ये शहीद शेतकरी साहेबराव करपे यांचे छायाचित्र आणि त्यांच्या आत्महत्या करताना लिहिलेल्या पत्राचे फलक लावण्यात येणार आहे. यानंतर १ मे राेजी महाराष्ट्रदिनी राज्यव्यापी आंदाेलन करण्यात येणार असून, त्याची घाेषणा २३ मार्च राेजी करण्यात येणार आहे.’’ 

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...