agriculture news in marathi, Sukhoi plane collapses on vineyard; Pilot safaut | Agrowon

सुखोई विमान द्राक्षबागेवर कोसळले; वैमानिक सुखरूप
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 जून 2018

ओझर, जि. नाशिक  :  एचएएलचे सुखोई विमान निफाड तालुक्यातील गोरठाण-वावी शिवारात सराव करत असताना अचानक तांत्रिक बिघाड होऊन कोसळले. त्यातील दोन वैमानिक पॅराशुटच्या साह्याने सुखरूप खाली उतरले. ही घटना बुधवारी (ता. २७) सकाळी १०.३० वाजता घडली.

ओझर, जि. नाशिक  :  एचएएलचे सुखोई विमान निफाड तालुक्यातील गोरठाण-वावी शिवारात सराव करत असताना अचानक तांत्रिक बिघाड होऊन कोसळले. त्यातील दोन वैमानिक पॅराशुटच्या साह्याने सुखरूप खाली उतरले. ही घटना बुधवारी (ता. २७) सकाळी १०.३० वाजता घडली.

ओझर येथील धावपट्टीवरून उड्डाण केलेले एचएएलचे सुखोई विमान काही तांत्रिक बाबीमुळे कोसळल्यामुळे परिसरात जोरदार आवाज झाला. जमिनीवर आपटताच आगीचे लोळ पसरले होते. आवाजामुळे परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल झाले. मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे वणीच्या पाच किलोमीटर अंतरावर वावी ठुशी भागात हे विमान कोसळले.

विमानातील वैमानिकांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने ते सुखरूप राहिले. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. एचएएलच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. विमान पूर्णपणे जळून खाक झाले आहे. ते संदीप ढोमसे यांच्या द्राक्षबागेवर कोसळले आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...