सातारा जिल्ह्यात ३३६५ हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  ः जिल्ह्यातील पूर्व भागात तीव्र पाणीटंचाईमुळे उन्हाळी पिके धोक्यात येऊ लागली आहे. गुरूवारअखेर (ता.१८) तीन हजार ३६५ हेक्‍टर म्हणजेच ४५.२२ टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. फलटण तालुक्‍यात सर्वाधिक ११२७ हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली असल्याची नोंद झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

अपुऱ्या पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात डिसेंबर महिन्यापासून पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या. याचा परिणाम उन्हाळी हंगामावर झाला असून एप्रिल महिना संपत आला असली तरी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कृषी विभागाकडून जिल्ह्यात ७४३६ हेक्‍टर क्षेत्र उन्हाळी पिकांच्या पेरणीसाठी निश्चित केले आहे. त्यापैकी गुरुवारअखेर (ता.१८) ३३६५ हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये फलटण तालुक्यातील सर्वाधिक ११२७ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या तालुक्यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याने येथील शेतकऱ्यांनी चारा पिकांची लागवड केली आहे. 

या तालुक्यात ११२७ हेक्टर क्षेत्रापैकी ९१४ हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड झाली आहे. पिकामध्ये उन्हाळी भुईमुगाची १७८९ तर मक्‍याची १५७५ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.  जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा व फलटण या तालुक्‍यांत तीव्र दुष्काळ असल्याने लागवड केलेली पिके धोक्यात आली आहे. 

पश्चिमेकडील तालुक्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाईचा पेरणीवर परिणाम झालेला आहे. यामुळे या हंगामात ३५ ते ४० टक्के क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे. या पाणीटंचाईचा परिणाम उसाच्या क्षेत्रावर झालेला आहे. तुटलेला ऊस काढणीवर भर दिला जात आहे.    तालुकानिहाय उन्हाळी पेरणी झालेली क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) ः सातारा २०५, जावली १३०, पाटण २६२, कराड ६५०, कोरेगाव ३३८, खटाव ८०, माण १९५, फलटण ११२७, खंडाळा २३, वाई ३५५. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com