नगर जिल्ह्यात भुईमुगाची २८७१ हेक्टरवर पेरणी

भुईमुग लागवड
भुईमुग लागवड
नगर  ः जिल्ह्यामध्ये आतापर्यंत उन्हाळी पिकांची सरासरी ४४ टक्के पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक २८७१ हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाची पेरणी झाली आहे. तीन तालुक्‍यांत उन्हाळी पिकांची पेरणीच झालेली नाही, तर तीन तालुक्‍यांत सरासरीपेक्षा जास्त पेरणी झाली आहे, असे कृषी विभागातून सांगण्यात आले. 
जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळी पिकांचे पेरणी केली जाते. यंदा मात्र उन्हाळी पिकांचे पेरणी क्षेत्र कमी झाल्याचे जाणकार सांगत आहेत. उन्हाळी मका, भुईमुग, बाजरी, भात, सूर्यफूल, तीळ, मूग, उडीद आदी पिकांचे सरासरी ८४०० हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापैकी आतापर्यंत ३६८२ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्यात मक्‍याचे ७९२, मुगाचे १९, भुईमुगाचे २८७१ हेक्‍टर क्षेत्र आहे. 
 
भात, बाजरी, सूर्यफूल, तीळ, उडदाची पेरणी झालेली नाही. शेवगाव, पाथर्डी व संगमनेर तालुक्‍यांत उन्हाळी पिकांची अजून पेरणी झालेली नाही, तर नेवासा, अकोले, राहाता या तालुक्‍यांत सरासरीपेक्षा जास्ती पेरणी झाली आहे, असे कृषी विभागातून सांगण्यात आले. 
 
तालुकानिहाय पेरणी कंसात सरासरी क्षेत्र (हेक्‍टर) ः 
नगर ः ९० (३००), पारनेर ः ६० (६००), श्रीगोंदा ः ५१० (१५८०), कर्जत ः ४० (६३०), जामखेड ः ३९७ (८२०), शेवगाव ः ० (५१०), पाथर्डी ः ० (५२०), संगमनेर ः ० (५२०), नेवासा ः ११८७ (१०१०), राहुरी ः ३२४ (६००), अकोले ः ३३८ (३००), कोपरगाव ः २८३ (४८०), श्रीरामपूर ः १६० (३१०), राहाता ः २९३ (२२०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com