सातारा जिल्ह्यात ५८ टक्के उन्हाळी पेरणी

भूईमूग
भूईमूग

सातारा : जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पेरणीस वेग आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५८.६६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा पिकांची अंतिम, तर गहू पिकांची काढणी व मळणीची कामे सुरू आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

पश्चिम भागातील तालुक्‍यांत पाण्याची उपलब्धतता असल्याने तेथील शेतकरी उन्हाळी पिकांची पेरणी करतात. सातारा, कऱ्हाड, जावली, पाटण, वाई, खंडाळा या तालुक्‍यांत भुईमूग, तर पूर्वेकडील दुष्काळी तालुक्‍यांत सूर्यफूल, मका व चारा पिके घेतली जातात.

जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पिकांचे सरासरी क्षेत्र सुमारे ७४३६ हेक्‍टर आहे. यामध्ये सर्वाधिक ५२८० हेक्‍टरवर भुईमूग, तर उर्वरित क्षेत्रावर सूर्यफूल, मका व काही प्रमाणात चारा पिके घेतली जातात. उन्हाळी पेरणीची कामे वेगात सुरू आहेत.

एकूण क्षेत्रापैकी सध्या ४३६२ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये भुईमुगाची २४७६, तर मक्‍याची १८८६ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. भाजीपाल्याच्या दरात वाढ न झाल्यामुळे भाजीपाला क्षेत्रात घट होणार आहे.

पाण्याची बचत, कमी तण, तसेच चांगले उत्पादन मिळावे यादृष्टीने भुईमूग पिकासाठी काही शेतकरी ठिबक संच व मल्चिंग पेपरचा वापर करतात. कृषी विभागाकडून उन्हाळी हंगामासाठी लागणारे बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

शेतकरी भुईमूग पेरणीसाठी घरातील बियाणे वापरास प्राधान्य देत आहेत. अनेक शेतकरी पावसाळ्याच्या सुरवातीस भुईमुगाच्या ओल्या शेंगा विकता याव्यात, यासाठी मार्चच्या सुरवातीस भुईमुगाची पेरणी करतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com