agriculture news in marathi, summer onion plantation status, khandesh, maharashtra | Agrowon

जळगाव, धुळे जिल्ह्यात उन्हाळ कांदा लागवड अंतिम टप्प्यात
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018
कांद्याची आवक वाढली की दर कमी होतात. सध्या उशिरा लागवडीचा कांदा येत आहे. तसेच साठवणूक केलेला कांदा व्यापारी मोकळा करीत आहेत. परिणामी बाजारातील दर अपेक्षित नाहीत. 
- आत्माराम बळिराम पाटील, शेतकरी, कापडणे, जि. धुळे.
जळगाव  ः खानदेशात धुळे व जळगाव जिल्ह्यांत उन्हाळ कांद्याची लागवड अंतिम टप्प्यात आहे. या महिन्याच्या सुरवातीला कांद्याचे दर चांगले असल्याने लागवडही वाढली, परंतु मागील पाच ते सहा दिवसांत दर कमी झाल्याने कांदा लागवड केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीची भीती सतावू लागली आहे. खानदेशात लागवडीखालील क्षेत्र मिळून एक हजार हेक्‍टरने वाढण्याची शक्‍यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. 
 
खानदेशात कांदा लागवडीसाठी धुळे तालुका आघाडीवर असून, या तालुक्‍यातील कापडणे, न्याहळोद व इतर भागांत चांगली लागवड झाली आहे. तसेच शिरपूर, शिंदखेडा व साक्री भागांतही कमी अधिक अशी लागवड आहे. जळगाव जिल्ह्यात एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव, मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडा आदी भागांत बऱ्यापैकी लागवड झाली आहे. ही लागवड वाढली असून,
यंदा जिल्ह्यात कांद्याचे सुमारे २७०० हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यात सुमारे ४०० हेक्‍टरने वाढ झाल्याचा अंदाज आहे.
 
जळगाव व धुळे जिल्ह्यांत मिळून सुमारे एक हजार हेक्‍टरने क्षेत्र वाढले आहे. धुळे जिल्ह्यातही सुमारे १५०० हेक्‍टरवर कांद्याची लागवड झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून कांदा दर तेजीत होते. जानेवारीतही चांगले दर राहिले. ही बाब लक्षात घेता कांदा लागवड वाढली.
 
अनेक शेतकऱ्यांनी यंदा पाण्याची उपलब्धता लक्षात घेता सूक्ष्मसिंचन पद्धतीचा अवलंब केला. तसेच गादीवाफ्यावर लागवड केली. त्यासाठी त्यांना यंदा खर्च अधिक आला, परंतु उत्पादन चांगले येईल व दर टिकून राहतील, अशी अपेक्षा होती. परंतु दर कमी होत असून, जळगाव बाजारात सरासरी दर २००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. धुळे व चाळीसगाव बाजार समितीमध्येही सरासरी दर अपेक्षित नाहीत. आठ ते दहा दिवसांपूर्वी कांद्याचे सरासरी दर २८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. परंतु ते कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
 
कांदा दर कमी झाल्याने खानदेशातील कांदा उत्पादक आता इंदूर (मध्य प्रदेश) येथील बाजारात कांदा नेत आहेत. तेथे दर बऱ्यापैकी मिळत असून, क्विंटलमागे वाहतूक खर्च धरून किमान १०० ते १५० रुपये अधिकचे मिळत असल्याचे सांगण्यात आले. 

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...