agriculture news in marathi, summer sowing starts, nagar, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात उन्हाळी पेरणीला प्रारंभ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जानेवारी 2018
सातारा  ः जिल्ह्यात काही भागांत उन्हाळी पीक पेरण्यांना प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे सरासरी क्षेत्र ७४३६ हेक्‍टर असून, यंदा सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर उन्हाळी पिकांच्या पेरण्या होण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची पेरणी करण्यास सुरवात केली आहे. 
 
सातारा  ः जिल्ह्यात काही भागांत उन्हाळी पीक पेरण्यांना प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे सरासरी क्षेत्र ७४३६ हेक्‍टर असून, यंदा सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर उन्हाळी पिकांच्या पेरण्या होण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची पेरणी करण्यास सुरवात केली आहे. 
 
जिल्ह्यात उन्हाळी हंगामात उन्हाळी भूईमूग व मका ही पिके घेतली जातात. जनावरांना चारा उपलब्ध व्हावा या दृष्टीने मका पिकावर भर दिला जात आहे. रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात मका पिकांची लागवड झाली आहे. दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव व खंडाळा तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे झाली आहेत.
 
यामुळे या दुष्काळी तालुक्‍यांतही उन्हाळी पेरण्या होणार आहे. जनावरांच्या चाऱ्याच्या दृष्टीने यंदा मक्‍याची जास्त पेरणी होण्याचा अंदाज आहे. खरीप हंगामात नगदी पिकांमुळे भुईमूग पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत आहे. परिणामी ज्या भागात पाण्याची उपलब्धतता आहे, अशा भागात उन्हाळी पेरण्या होणार आहेत. 
 
सातारा, कऱ्हाड, वाई, जावली, पाटण या तालुक्‍यात उन्हाळी भुईमुगाच्या पेरणीस प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात भुईमुगाचे ५२८०, तर मक्‍याचे २१५६ असे एकूण सात हजार ४३६ हेक्‍टर सरासरी क्षेत्र आहे. जानेवारी महिन्याच्या सुरवातीपासून भुईमुगाच्या पेरणीस सुरवात झाली आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात उसात आंतरपीक म्हणूनही भुईमुगाची लागवड करण्याचा कल वाढला आहे.
जून महिन्यात ओल्या भुईमूग शेंगेस दर चांगला मिळतो, या दृष्टीने मार्च महिन्यातही भुईमूग पिकाची लागवड केली जाते. 

इतर ताज्या घडामोडी
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या...अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर,...
खानदेशात भुईमूग पीक जेमतेमजळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे...
सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
प्रस्तावित सुरत-हैदराबाद...नाशिक : केंद्राच्या भारतमाला योजनेंतर्गत...
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या...शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने...
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारीसांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला...