agriculture news in marathi, sunday fruit and vegetable market, pune | Agrowon

पुण्यात कांदा, फ्लॉवर, वांगी, शेवग्याच्या दरात वाढ
गणेश कोरे
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता.१) खोल समुद्रातील मासळीची १२ टन, नदी आणि खाडीची प्रत्येकी सुमारे ५०० किलो, तर आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे १६ टन आवक झाली हाेती.

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १) भाजीपाल्याची सुमारे २०० ट्रक आवक झाली हाेती. शनिवारी (ता. ३०) झालेल्या दसऱ्यामुळे बाजारातील आवक सरासरीपेक्षा थाेडी मंदावली हाेती. तर ग्राहकदेखील तुलनेने कमी हाेते. कांदा, फ्लाॅवर, वांगी, सिमली मिरची, ताेंडली, शेवगा, मटार, पावटा या भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने त्यांच्या दरात वाढ झाली हाेती. तर पालेभाज्यांचे वाढलेले दर कायम हाेते. 

भाजीपाल्याच्या प्रमुख आवकेमध्ये परराज्यातून कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे १५ टेम्पाे हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून ४ ट्रक काेबी, कर्नाटकातून भुईमूग सुमारे ३ टेम्पाे, आंध्र प्रदेशातून शेवगा सुमारे २ टेम्पाे, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसूण सुमारे पाच हजार गोणी तर आग्रा, इंदाैर, गुजरात आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे १२५ ट्रक आवक झाली हाेती.

स्थानिक विभागातील आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ३०० गाेणी, टोमॅटो सुमारे ५ हजार क्रेटस, कोबी आणि फ्लाॅवर १० तर फ्लाॅवर १० टेम्पाे, सिमला मिरची १२ टेम्पाे, पारनेर, पुरंदर, वाई सातारा परिसरातून मटार सुमारे ३०० गाेणी, तांबडा भाेपळा १० टेम्पाे, भेंडी सुमारे १० तर गवार सुमारे ५ टेम्पाे, गाजर सुमारे ८ हजार गाेणी, तर कांदा सुमारे ८० ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : १५० - १९०, बटाटा : ६०-८०, लसूण : २५०-४५०, आले सातारी : २००-२६०, भेंडी : २००-२५०, गवार : गावरान व सुरती - ३००-४००, टोमॅटो : १००-१२०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २००-२५०, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २००-२५०, काकडी : ६०-१२०, कारली : हिरवी १४०-१६०, पांढरी : ९०-१००, पापडी : २००-२५०, पडवळ : २५०-३००, फ्लॉवर : २००-२५०, कोबी : १६०-२२०, वांगी : ३००-४००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : १४०-१५०, ढोबळी मिरची : २५०-३५०, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १००-१२०, शेवगा : ८००, गाजर : १८०-२२०, वालवर : २५०-३००, बीट : १४०-१६०, घेवडा : ३००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-३००, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २००-२५०, मटार : स्थानिक : ८००-१२००, पावटा : ४५०-५००, तांबडा भोपळा : ८०-१००, भुइमूग शेंग - ३००-४००, सुरण : २५०-३००, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव
पालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे एक लाख तर मेथीची सुमारे २५ हजार जुड्या आवक झाली हाेती.
कोथिंबीर : १५००-२५००, मेथी : १५००-१८००, शेपू : ५००-८००, कांदापात : ५००-१०००, चाकवत : ५००-६००, करडई : ५००-७००, पुदिना : ४००-८००, अंबाडी : ५००-७००, मुळे : ८००-१०००, राजगिरा : ५००-६००, चुका :  ८००-१०००, चवळई : ८००-१०००, पालक : १०००-१५००.

फळ बाजार
फळ बाजारात रविवारी (ता. १) लिंबांची सुमारे ४ हजार गाेणी आवक झाली हाेती. माेसंबी सुमारे ७० टन, संत्रा सुमारे १० टन, सीताफळ २५ टन, डाळिंब सुमारे १०० टन, कलिंगड सुमारे ३५ टेम्पाे, खरबूज सुमारे १० टेम्पाे, पपई सुमारे २५ टेम्पाे, चिक्कू सुमारे ५०० बॉक्स, पेरू सुमारे ३०० क्रेटची आवक झाली हाेती.

फळांचे दर पुढीलप्रमाणे
लिंबे (प्रति गोणी) : १५०-३५०, मोसंबी : (३ डझन) : १३०-२३०, (४ डझन ) : ५०-११०, संत्रा (३ डझन) १००-२३०, (४ डझन) : ५०-१००, सिताफळ : १०-१४०, (प्रति किलोस) डाळिंब : भगवा : ३०-७०, गणेश १०-३०, आरक्ता १०-५०, कलिंगड ५-१०, खरबुज १०-२०, पपई ५-२० चिक्कू : १००-४०० (१० किलाे), पेरू (२० किलो) : ५००-६००, सफरचंद सिमला २०-२५ किलाे ११००- २०००, काश्मीर डेलिशिअस (१५) ७००-१३००.
फूल बाजाराला दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सुटी असल्याने रविवारी (ता. १) फूलबाजार बंद हाेता. 

मटण-मासळी
नवरात्राचे उपवास संपल्याने मासळीला मागणी वाढली हाेती. मागणी वाढणार असल्याने बाजारात मासळाची आवक गेल्या काही दिवसांच्या तुलनेत दुपटीने वाढली हाेती. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता.१) खोल समुद्रातील मासळीची १२ टन, नदी आणि खाडीची प्रत्येकी सुमारे ५०० किलो, तर आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे १६ टन आवक झाली हाेती. आवक वाढूनदेखील मागणी वाढल्याने विविध मासळींच्या दरात वाढ झाली हाेती. 
भाव (प्रतिकिलो) पापलेट - कापरी ः १४००, माेठे ः १४००, मध्यम ः ८००, लहान ः ८५०, भिला ः ४८०, हलवा ः ४४०, सुरमई ः ४४०, रावस लहान ः ४८०, मोठा ः ४८०, घोळ ः ५५०, करली ः २८०, करंदी ( सोललेली ) ः २५०, भिंग ः २८०, पाला : ५५०-१२००, वाम ः २४०-३२०, ओले बोंबील ः ६०-१२०.

कोळंबी - लहान : २४०, मोठी :४८०-५५०, जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स ः ७५०, लॉबस्टर ः १४००, मोरी : २००-२४०, मांदेली : ६०-१००, राणीमासा : १२०-२४०, खेकडे : १२०-२००, चिंबोऱ्या : ४००.

खाडीची मासळी - सौंदाळे ः १८०, खापी ः १८०, नगली ः २४०-४४०, तांबोशी ः ३२०-३६०, पालू ः २००, लेपा ः १२०-१८०, शेवटे : १८०, बांगडा : १००-१८०, पेडवी ः ६०, बेळुंजी ः १२०, तिसऱ्या : १६०, खुबे : १४०, तारली : १००-१२०.
नदीची मासळी - रहू ः १४०, कतला ः १६०, मरळ ः ३६०, शिवडा : २००, चिलापी : ६०, मांगूर : १२०, खवली : १४०, आम्ळी ः ६०, खेकडे ः १६० वाम ः ४००.

मटण : बोकडाचे : ४४०, बोल्हाईचे ः ४४०, खिमा ः ४४०, कलेजी : ४८०.

चिकन - चिकन ः १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २६०.

अंडी - गावरान - शेकडा : ६००, डझन : ८४, प्रति नग : ७.
इंग्लिश शेकडा : ३१५, डझन : ५४, प्रतिनग : ४.५०.

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्या वाढल्या ‘खरीप वेदना’पुणे : सोयाबीनचे कोसळेले भाव, तूर-मुगाची वेळेत न...
लोकभावनेच्या दबावामुळे कर्जमाफीत काही...नागपूर : कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिवाळीआधी...
अखेर ‘डीबीटी’ धोरण जिल्हा परिषद सेस...पुणे  : राज्यात जिल्हा परिषदांमधील सेस...
साखर उद्योगाबाबत केंद्राशी वाटाघाटी करानागपूर : शेतकरी संघटना उसाला ३,५०० रुपयांची मागणी...
गोंदिया 11.5 अंशांवरपुणे : उत्तरेकडून थंड वारे वाहू लागले आहेत. याचा...
सरकारने शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला ः...औरंगाबाद: आलटून पालटून सत्ता भोगण्याचे सत्ताधारी...
भाजीपाला उत्पादकांचा धुक्‍यात घुसमटतोय...कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांत भाजीपाल्याचे दर...
बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष बागा...सांगली : जिल्ह्यातील द्राक्ष पट्ट्यात गेल्या तीन...
कोल्हापूरचे शिवसेना आमदार प्रकाश...नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
बोंडअळीग्रस्तांना मदतीसाठी रॅपरची अट...नागपूर ः बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त शेतकऱ्यांना...
कीडरोग सर्व्हेक्षकांना टाकणार काळ्या...नागपूर : कीडरोग सर्व्हेक्षकांनी आपल्या विविध...
विदर्भासाठी कृषी विभागाचा ॲक्‍शन प्लॅननागपूर ः कापूस आणि सोयाबीन उत्पादक पट्टयात रेशीम...
मदतीअभावी राज्यातील सूतगिरण्यांना घरघर...सोलापूर ः कापसाचे वाढलेले दर, सरकारचे कुचकामी...
उसामध्ये योग्य प्रकारे करा मोठी बांधणीउसाची भरणी केल्यानंतर १ ते १.५ महिन्याने लहान...
उपक्रमशीलता असावी तर चांगदेवच्या...जळगाव जिल्ह्यातील चांगदेव गाव परिसरातील...
सेंद्रिय भाजीपाल्यासाठी थेट मिळवले...नागपूरचे रहिवासी असलेल्या सुनील कोंडे या...
अर्थकारण सुधारणारी तरुणाची एकात्मिक...एकात्मिक शेती पद्धतीचा अंगीकार केल्यानेच सराफवाडी...
कृषी आयुक्तालयातील दक्षता पथक प्रमुखाची...पुणे : राज्याच्या कृषी आयुक्तालयातील दक्षता...
थेट विक्री, प्रक्रियेतून फायदेशीर...दुग्ध व्यवसाय अत्यंत खर्चिक झाला आहे. केवळ...
धान, बोंड अळीग्रस्तांना मदत : पांडूरंग...नागपूर ः गुलाबी बोंड अळीमुळे २० जिल्ह्यांतील...