agriculture news in Marathi, sunil tatkare says farmers are in trouble within three years, Maharashtra | Agrowon

तीन वर्षांत शेतकऱ्यांची अवस्था बिकट : सनिल तटकरे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

मुंबई ः सत्तांतर होऊन तीन वर्षांचा कालावधी झाला आहे. या तीन वर्षांत राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून अजूनही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी (ता. ६) केली. 

मुंबई ः सत्तांतर होऊन तीन वर्षांचा कालावधी झाला आहे. या तीन वर्षांत राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून अजूनही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी (ता. ६) केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय चिंतन शिबिर कर्जत (जि. रायगड) येथे आयोजित करण्यात आले आहे. या वेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आदींसह पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, खासदार, आमदार आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 
ते पुढे म्हणाले, की सरकारने शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती भरली तर फौजदारी कारवाई केली जाईल असे सरकार म्हणते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आहे. २०१४ पासून भाजपचे सरकार आहे, शिवसेना त्यांच्यामागे फरफटत जात आहे. सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाविरोधात शिवसेना प्रखर टीका करते. जे निर्णय प्रक्रियेत आहेत तेच मोर्चा काढतात, आंदोलन करतात. ही विसंगती जनतेपर्यंत पोचवली पाहिजे. सोशल मीडियावर सरकारचे सुरवातीला कौतुक होत होते. मात्र, मागील ३ महिन्यांपासून सोशल मीडियावर सरकार विरोधात वातावरण तयार झाले आहे.                                                                   

 ...तर शरद पवार पंतप्रधान : प्रफुल्ल पटेल
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधात वातावरण पेटत आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. देशातील बदलत्या राजकीय वातावरणामुळे २०१९ ला शरद पवार पंतप्रधान होतील असा विश्वास राष्ट्रवादीला वाटतो आहे. १९९९ मध्ये राष्ट्रवादीला अटलबिहारी वाजपेयींनी एनडीएमध्ये येण्याचा आग्रह केला होता. तेव्हा अनेक धर्मनिरपेक्ष पक्ष एनडीएमध्ये गेले. शरद पवार यांना तेव्हा दोन नंबरचे स्थान मिळाले असते. पण शरद पवार आपली विचारधारा सोडून एनडीए बरोबर गेले नाहीत. मग आता भाजपबाबत संभ्रम का निर्माण केला जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही हा संभ्रम आहे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडली तर राष्ट्रवादी ती जागा भरून काढेल, असे बोलले जाते. पण असा निर्णय कुणी घेतला? आपले नेतेही आपसात चर्चा करतात, हे थांबवा. राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...