agriculture news in marathi, Supermoon, bluemoon, maharashtra | Agrowon

'सुपरमून, ब्ल्यूमून' एकत्र पाहण्याचा आज 'चंद्र'योग !
वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

मुंबई : सुपरमून, ब्ल्यूमून आणि खग्रास चंद्रग्रहण एकत्रित पाहण्याचा दुर्मिळ योग १५२ वर्षांनी आज (ता.३१) आला आहे. आकाशातील हा अद्‌भूत सोहळा पाहण्याची पर्वणी खगोलप्रेमींना मिळणार आहे. विशेष म्हणजे ही स्थिती साध्या डोळ्यांनीही पाहता येणार आहे. 

मुंबई : सुपरमून, ब्ल्यूमून आणि खग्रास चंद्रग्रहण एकत्रित पाहण्याचा दुर्मिळ योग १५२ वर्षांनी आज (ता.३१) आला आहे. आकाशातील हा अद्‌भूत सोहळा पाहण्याची पर्वणी खगोलप्रेमींना मिळणार आहे. विशेष म्हणजे ही स्थिती साध्या डोळ्यांनीही पाहता येणार आहे. 

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो, तेव्हा त्याला सुपरमून  म्हणतात. मात्र सुपरमून ही संज्ञा खगोलशास्त्रीय नाही. रिचर्ड नोले यांनी १९७९ मध्ये हे नाव दिले. अशावेळी चंद्रबिंब १४  टक्के मोठे व ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने त्या दिवशी पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाराने मोठे दिसणार आहे. एका महिन्यात जेव्हा दोन पौर्णिमा येतात, त्यावेळी दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्रास ब्ल्यू मून  म्हणतात. त्याला ब्ल्यू मून म्हटले गेले असले तरी त्यावेळी चंद्र ब्ल्यू दिसत नाही. या वेळी २ जानेवारी आणि ३१ जानेवारी अशा दोन पौर्णिमा आल्या आहेत. म्हणून ३१ जानेवारीच्या चंद्रास ब्ल्यू मून  म्हटले आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांपासून ते रात्री ७ वाजून ३८ मिनिटांपर्यंत आकाशात पूर्वेकडे साध्या डोळ्यांनी सुपर आणि ब्ल्यू मूनचे दर्शन घेता येईल, अशी माहिती दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. ३१ मार्च १८६६ नंतर १५२ वर्षांनी हा योग येणार आहे. 

चंद्रग्रहण 
बुधवारी सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. म्हणजे चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत येण्यास प्रारंभ होईल. सायंकाळी ६ वाजून २१ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीस प्रारंभ होईल. परंतु त्यावेळी चंद्रबिंब आपल्या क्षितिजाच्याखाली असल्याने आपणास दिसू शकणार नाही. नंतर सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी पूर्व क्षितिजावर खग्रास स्थितीमध्ये चंद्रोदय होईल. ग्रहणमध्य सायंकाळी सात वाजता असून त्यावेळी चंद्रबिंब आकाशात पूर्वेला बरेच वर आलेले दिसेल. खग्रास स्थिती समाप्ती सायंकाळी ७ वाजून ३८  मिनिटांनी होईल आणि रात्री ८ वाजून  ४२ मिनिटांनी ग्रहण सुटेल.

इतर अॅग्रो विशेष
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...